

पिंपळनेर,जि.धुळे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर नगर परिषदेसाठी तब्बल रु. १५ कोटी ६० लक्षांचा भरीव विकासनिधी मंजूर झाला असून शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.आमदार सौ.मंजुळा तुळशीराम गावित व शिवसेना जिल्हाध्यक्ष तुळशीराम बुधा गावित यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला.त्यांच्या विकासाभिमुख धोरणामुळे पिंपळनेर शहर आधुनिकतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार आहे.
स्मशानभूमी विकास २ कोटी
पांझरा रिव्हर फ्रंट सुशोभीकरण १ कोटी
आधुनिक अभ्यासिका (सभागृह),सोलर सिस्टिम व जनरेटरसह ३ कोटी
नवीन पुल ते साई रिसॉर्ट चौक विद्युत पोल, सीसीटीव्ही व बैठक व्यवस्था २ कोटी
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकास व संरक्षण भिंत ४ कोटी
विविध प्रभागांमध्ये रस्ते, गटार,विद्युत सुविधा मोठ्या प्रमाणावर निधी
अंतर्गत रस्ते व गटारी काँक्रीटीकरणासाठी स्वतंत्र तरतूद
या निधीमुळे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत होणार असून नागरिकांना सुरक्षित, सुशोभित व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
▪️नगरसेवक संभाजी शिवाजीराव अहिरराव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने व आमदार मॅडम तसेच जिल्हाध्यक्ष साहेबांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे पिंपळनेरच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.हा निधी म्हणजे शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत पाया आहे.”
पिंपळनेरकर नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून शहर विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्याचबरोबर पिंपळनेर नगर परिषदेतील सर्व शिवसेनेचे नगरसेवक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या तालुक्याचे आमदार मंजुळा गावित त्याचबरोबर शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित यांचे मनापासून आभार व्यक्त केले.