Dhule Crime | धुळे जिल्हा पोलिसांची विशेष तपासणी मोहीम: 245 वाहनधारकांकडून दीड लाख दंड वसूल

धुळे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम अंतर्गत कायदा भंग करणाऱ्या असामाजिक तत्त्वावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला
Dhule  Police Traffic Fine Collected
Dhule Police Traffic Fine Collected Pudhari
Published on
Updated on

Dhule Police Traffic Fine Collected

धुळे: धुळे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम अंतर्गत कायदा भंग करणाऱ्या असामाजिक तत्त्वावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. यात विशेषता गावठी दारू निर्मिती आणि विक्री केंद्रांना देखील लक्ष करण्यात आले. जिल्ह्यातील 23 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून यात वाहन चालवणाऱ्या तळीरामाकडून देखील दंडाची वसुली करण्यात आली आहे.

धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हयात अचानक विशेष मोहिम राबवली. अवैध धंदयांवर तसेच असामाजिक घटकांवर कारवाई करण्याकरीता धुळे जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखा यांना यासाठी निर्देश दिले होते.

त्यानुसार संपूर्ण धुळे जिल्हयात विशेष मोहिम राबवून असामाजिक घटकांवर कारवाई आली आहे.

Dhule  Police Traffic Fine Collected
Dhule Crime | व्यापाऱ्यांचा अश्लील व्हिडिओ काढून खंडणीचा धंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 22 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याअंतर्गत 245 वाहनधारकांकडून एक लाख 56 हजार 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याच अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयाजवळ दुचाकी तसेच बुलेट ला बेकायदेशीर सायलेन्सर लावून नियमभंग करणाऱ्या 18 तरुणांना देखील कारवाईचा दणका बसला आहे.

त्यांच्याकडून अठरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय मद्य सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्यां 9 जणांवर कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणारे 8 जण, पानटपरीवर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यां 33 जणांवर कोटपा कायद्यान्वये कारवाई केली आहे.

अवैध हातभट्टीवर कारवाई करतांना 32 आरोपींविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येवून 47 हजार 750 रूपये किंमतीचे 32 हजार 540 लिटर गावठी हातभट्टी दारु व रसायन नष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news