Dhule Police | सातारा दरोड्यातील चोरट्यांना धुळे पोलिसांच्या बेड्या; पाच जण अटकेत, २२ तोळे सोने जप्त

Dhule Robbery case | पाच दरोडेखोरांना शिरपूर येथे पाठलाग करून अटक
Crime News
Crime NewsPudhari File Photo
Published on
Updated on

Satara thieves caught in Dhule

धुळे : सातारा जिल्ह्यातील सराफा कुरिअरवर दरोडा टाकून पांढऱ्या कारमधून पसार झालेल्या पाच दरोडेखोरांना धुळे पोलिसांनी शिरपूर येथे पाठलाग करून अटक केली. आरोपींकडून २२ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

सातारा येथील न्यू लक्ष्मी कुरिअर कंपनीचे मालक प्रमोद परमार व कर्मचारी कोमल परिहार हे काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हावरून सोने कुरिअरसाठी घेऊन जात असताना पाच जणांनी त्यांना अडवून २२ तोळे सोने लुटले. त्यानंतर आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारने पसार झाले.

Crime News
Dhule Crime | धुळे जिल्हा पोलिसांची विशेष तपासणी मोहीम: 245 वाहनधारकांकडून दीड लाख दंड वसूल

घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी धुळे जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला. पांढऱ्या कारचा एका बाजूचा काच फुटलेला असल्याची व कारमधील संशयितांची संख्या याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली. आरोपी मध्यप्रदेशकडे पळण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

यानंतर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने हालचाली करत मुंबई-आग्रा महामार्गावर शहर हद्दीपासून मध्यप्रदेश सीमेपर्यंत ठिकठिकाणी सापळे लावण्याचे आदेश दिले.

Crime News
Dhule News | शिरपूर तालुक्यातील आंबेपाडा मध्ये विषबाधेने विवाहितेसह दोन चिमूरड्यांचा मृत्यू!

शिरपूर तालुक्यात तपासणीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व त्यांच्या पथकाने संशयित पांढऱ्या कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने टोल नाका टाळून शिरपूर गावातील रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून कार अडवली व पाच जणांना ताब्यात घेतले.

अभिषेक सुरेंद्र शिकलबार, अंकुश जाट, अनुज रामाधर दिवाकर, पंकज केदार राठोड व अजय फौजदा राठोड (सर्व रा. गोलेगा मंदिर परिसर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले २२ तोळे सोने जप्त करण्यात आले. सातारा पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news