Dhule Ring road| धुळ्याच्या रिंग रोडसाठी लवकरच निविदा प्रक्रिया : मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

आमदार अनुप अग्रवाल व भाजपा शिष्टमंडळाने घेतली भेट
Nitin Gadkari
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची आमदार अनुप अग्रवाल यांनी भेट घेतली. Pudhari Photo
Published on
Updated on

धुळे : धुळे शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या रिंग रोडची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. याशिवाय शहरातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग काँक्रिटीकरण, पांझरा नदीवर कालिकामाता मंदिर ते जयहिंद तरणतलावापर्यंत पूल, पारोळा चौफुली ते फागणे गावापुढील अमळनेर चौफुलीपर्यंत चार पदरी रस्ता आदी विकासकामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली, अशी माहिती धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.

Nitin Gadkari
Dhule Accident News : गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर बस थांब्यात शिरून दोन प्रवासी ठार

आमदार अनुप अग्रवाल, भारतीय जनता पक्षाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, रावेरचे आमदार अमोल जावळे, भाजपचे महानगर जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार अग्रवाल यांनी शहरातील प्रलंबित रिंग रोडसह विविध विकासकामांच्या पूर्ततेची मागणी करत निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

आमदार अग्रवाल यांनी सांगितले की, धुळे शहर भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असून, शहरातून तसेच शहराला लागून सहा राष्ट्रीय महामार्ग जातात. याशिवाय धुळे शहरातील वाढते उद्योग, व्यवसाय तसेच मोठ्या बाजारपेठेमुळे शहरात येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे शहालगतच्या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढत आहे या पार्श्वभूमीवर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच मालेगाव-कुसुंबा-दोंडाईचा या राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोडची आवश्यकता आहे. अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.

Nitin Gadkari
Dhule News : दिवाळीत खाजगी बसने नियमबाह्य भाडे आकारल्यास कारवाई होणार

शहरात विकासकामांसाठी निधीची मागणी

आमदार अग्रवाल यांनी धुळे शहरातील विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी केंद्रीय रस्ते निधीतून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री गडकरी यांच्याकडे केली. यामध्ये शहरातील जुन्या आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महात्मा गांधी पुतळा, संतोषीमाता चौक ते दसरा मैदान, नकाणे रोड-शारदा नेत्रालय, नेताजी ग्राउंड ते वाडीभोकर रोड, फरशी पूल चौक ते बारा पत्थर, संतोषी माता चौक ते सिद्धिविनायक गणपती मंदिर-स्वामी समर्थ केंद्र ते कानुश्री मंगल कार्यालय या रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग काँक्रिटीकरण करणे आदी कामांसाठी केंद्रीय रस्ते निधीसह अन्य फंडांतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

रिंग रोडसाठी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया

आमदार अग्रवाल यांच्या मागणीवर मंत्री गडकरी म्हणाले, शहराबाहेरून जाणाऱ्या रिंग रोडसाठी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. तशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. अन्य विकासकामांच्या पूर्ततेच्या मागणीवर सकारात्मक असून, या कामांसाठीही तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही मंत्री गडकरी यांनी आमदार अग्रवाल यांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news