

धुळे : दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे खाजगी आराम बस चालकांकडून वसूल केले जात असल्याच्या तक्रारी असल्यामुळे आता प्रादेशिक परिवहन विभाग सक्रिय झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तुलनेत ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच भाडे वसूल करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या खाजगी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिवाळी सणाच्या कालावधीत प्रवाशी आणि विद्यार्थी मोठया प्रमाणात गावी ये-जा करतात. या पार्श्वभूमीवर खाजगी प्रवासी बस मालक व चालकांनी नियमानुसारच भाडे आकारावे, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे यांनी मंगळवारी (दि.14) केले आहे.
आगामी दिवाळी सणाच्या कालावधीत खाजगी प्रवासी बसचालक आणि मालकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील भाडेदर निश्चित केले आहे. सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी बसेसचे भाडे हे एस.टी महामंडळाच्या कि.मी भाडे दराच्या प्रती किलोमीटर भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही. असे कमाल भाडेदर शासनाने 27 एप्रिल 2018 रोजी निश्चित केले आहे. कंत्राटी परवाना वाहनाचे प्रती बस, प्रति किलोमीटर, प्रति आसन कमाल भाडे राज्य परिवहन महामंडळाचे भाडे अधिक 50 टक्के धरुन भाडेदर पुढील प्रमाणे आहे.
धुळे ते मुंबई दरम्यान 348 किमी.अंतरासाठी निमआराम (नॉन एसी )एस.सी 44 साठी 1117 रूपये, आराम (एसी) स्लिपर-44 साठी 1159 रूपये, आराम (एसी) स्लिपर-30 साठी 1246 रूपये.
धुळे ते पुणे (संगमनेर मार्गे) दरम्यान 348 किमी अंतरासाठी निमआराम (नॉन एसी ) एस.सी 44 साठी 1117 रूपये, आराम (एसी) स्लिपर-44 साठी 1159 रूपये, आराम (एसी) स्लिपर-30 साठी 1246 रूपये.
धुळे पुणे (नगर) दरम्यान 351कि मी अंतरासाठी निमआराम (नॉन एसी )एस.सी 44 साठी 1117 रूपये, आराम (एसी) स्लिपर-44 साठी 1170 रूपये, आराम (एसी) स्लिपर-30 साठी 1257 रूपये.
धुळे ते पनवेल दरम्यान 337 किमी अंतरासाठी निमआराम (नॉन एसी )एस.सी 44 साठी 1182 रूपये, आराम (एसी) स्लिपर-44 साठी 1122 रूपये, आराम (एसी) स्लिपर-30 साठी 1206 रूपये.
धुळे ते बोरीवली दरम्यान 341किमी अंतरासाठी निमआराम (नॉन एसी )एस.सी 44 साठी 1095 रूपये, आराम (एसी) स्लिपर-44 साठी 1136 रूपये, आराम (एसी) स्लिपर-30 साठी 1221 रूपये.
धुळे ते नागपूर दरम्यान 548 किमी अंतरासाठी निमआराम (नॉन एसी ) एस.सी 44 साठी 1760 रूपये, आराम (एसी) स्लिपर-44 साठी 1825 रूपये, आराम (एसी) स्लिपर-30 साठी 1962 रूपये.
धुळे ते कोल्हापूर दरम्यान 589 किमी अंतरासाठी निमआराम (नॉन एसी )एस.सी 44 साठी 1891 रूपये, आराम (एसी) स्लिपर-44 साठी 1961 रूपये, आराम (एसी) स्लिपर-30 साठी 2109 रूपये.
धुळे ते सुरत दरम्यान 226 किमी अंतरासाठी निमआराम (नॉन एसी )एस.सी 44 साठी 725 रूपये, आराम (एसी) स्लिपर-44 साठी 753 रूपये,आराम (एसी) स्लिपर-30 साठी 810 रूपये.
धुळे ते अहमदाबाद दरम्यान 489 किमी अंतरासाठी निमआराम (नॉन एसी )एस.सी 44 साठी 1570 रूपये, आराम (एसी) स्लिपर-44 साठी 1628 रूपये, आराम (एसी) स्लिपर-30 साठी 1751 रूपये.
सर्व खाजगी बस चालक, मालक यांनी नियमाप्रमाणे भाडे आकारण्यात यावे. तसेच प्रवाशी वाहतूक करताना प्रवाशांच्या सुरक्षेस कुठलीही बाधा होणार नाही,याची काळजी घ्यावी. जे प्रवासी वाहतूकदार नियमाप्रमाणे वाहतूक करणार नाहीत, अशा चालक आणि मालक यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. असेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे यांनी यावेळी स्पष्ट केले.