पिंपळनेरमध्ये महाविकास आघाडीतर्फे गुलाल उधळून विजयोत्सव साजरा

पिंपळनेरमध्ये महाविकास आघाडीतर्फे गुलाल उधळून विजयोत्सव साजरा

पिंपळनेर,जि.धुळे – पुढारी वृत्तसेवा: पिंपळनेरसह पश्चिम पट्टयात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात ॲड. गोवाल पाडवी हे काँग्रेसतर्फे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने पिंपळनेर शहरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतीषबाजी करत विजयोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ढोल ताशा व पारंपारिक वाद्याने महिलांसह पुरुषांनी ठेका धरला. नंदुरबार लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भाजपाची सत्ता होती. पण पुन्हा काँग्रेसने हा विजय खेचून आल्याने नंदुरबार लोकसभेमध्ये काँग्रेसचा हा विजय मोठा मानला जात आहे. महाविकास घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात हा आनंद साजरा केला.

प्रत्येक गावात खेड्यामध्ये नागरिकांनी गुलालाची उधळण केली. तसेच पारंपारिक वाद्य वाजवीत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी पंचायत सदस्य पी. एस. पाटील, सोनवणे, पांडुरग सूर्यवंशी, अफसर सैय्यद, अनिल गायकवाड, नानाभाऊ खरोटे, प्रेमचंद सोनवणे, ज्ञानेश्वर पगारे, हाजी जावेद सैय्यद, वाजिद पठाण, महेश वाघ, उदय बिरारी, मनोज खैरनार, स्वप्निल चित्ते, बाबा शेख, शब्बीर पटेल, मुश्रफ शेख, सोहेब शेख, आशिष मालुसरे, अजय मोरे, अब्रार शेख, तुषार गवळी, जाकीर शेख, आशिष मालुसरे, नौशाद सैय्यद, संदिप देवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news