Heena Gavit | महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी महिलांच्या स्वाभिमानावर घाला
Women reservation protest
Heena Gavit Pudhari
Published on
Updated on

Women reservation protest

धुळे : महिला आरक्षणाला विरोध करून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी महिलांच्या स्वाभिमानावर घाला घातला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महिला मतदार त्यांना निश्चित धडा शिकवतील, असा इशारा माजी खासदार हिना गावित यांनी दिला. महिलांना आरक्षण मिळेपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

धुळे शहरातील भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ‘नारी शक्ती वंदन विधेयक २०२६’ या विषयावर भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Women reservation protest
Dhule Accident | भरधाव पिकअपची दुचाकीला धडक : अकरावीतील विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

यावेळी बोलताना गावित यांनी सांगितले की, या विधेयकाद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हे आरक्षण लागू करण्याची प्रक्रिया प्रस्तावित होती. मात्र विरोधकांच्या भूमिकेमुळे महिलांना प्रतिनिधित्वाची मोठी संधी नाकारली गेली, अशी टीका त्यांनी केली.

हे विधेयक मंजूर झाल्यास संसदेत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग वाढला असता, असेही त्यांनी नमूद केले. परंतु विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करत महिलांच्या सक्षमीकरणाला अडथळा निर्माण केला, असा आरोप त्यांनी केला.

Women reservation protest
Dhule Politics | शिंदखेडा तालुक्यात सामूहिक पक्षप्रवेश; भाजप कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात दाखल

“सशक्त नारी, सशक्त भारत” हा भाजपाचा नारा असून, महिलांच्या हक्कांसाठी पक्ष कटिबद्ध आहे. महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार या विधेयकाच्या समर्थनार्थ राज्यभरातून एक कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्याचा निर्धार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे देशातील महिलांमध्ये संताप असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news