Dhule Politics | शिंदखेडा तालुक्यात सामूहिक पक्षप्रवेश; भाजप कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात दाखल

धुळे जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट करण्याचा पक्षाचा प्रयत्न
Dhule BJP workers join Shiv Sena
Dhule BJP workers join Shiv Sena Pudhari
Published on
Updated on

Dhule BJP workers join Shiv Sena

सोनगीर (धुळे) : शिंदखेडा तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये सामूहिक प्रवेश झाला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या सोहळ्यात माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या सोबत भूषण पवार, भालचंद्र पाटील, मुरलीधर माळी, देवाराम चौधरी, गुलजारसिंह गिरासे, राजेंद्र बडगुजर, जितेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, सचिन चौधरी आणि सागर बडगुजर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षांतर केले.

Dhule BJP workers join Shiv Sena
Dhule Politics | धुळ्याचे पहिले महापौर भगवान करनकाळ यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

यावेळी बोलताना प्रकाश चौधरी यांनी सांगितले की, समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असून तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. धुळे जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भाजपमधील काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा असून, अपेक्षित संधी न मिळाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. धुळे येथील माजी महापौर भगवान बापू करंकाळ यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने या घडामोडींना अधिक बळ मिळाले आहे.

Dhule BJP workers join Shiv Sena
Dhule News | नियमित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी अडचणीत

या प्रक्रियेत जिल्हाध्यक्ष मनोज मोरे व शहराध्यक्ष सोनू वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाचा परिणाम जाणवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालत पक्षाने राज्यात भक्कम स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत दाखल होत असून, धुळे जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news