MP Shobha Bachhav | सुशीनाला परिसरातील बाधितांच्या पुनर्वसनासाठी खा. शोभाताई बच्छाव यांचे सुनेत्रा पवार यांच्याकडे साकडे

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले
Shobha Bachhav meet Sunetra Pawar
खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले Pudhari
Published on
Updated on

Shobha Bachhav meet Sunetra Pawar

धुळे : धुळे शहरातील सुशीनाला परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागांना आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

खासदार डॉ. बच्छाव यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुशीनाला परिसरातील अनेक कुटुंबे अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. अतिक्रमण हटाव कारवाईनंतर या कुटुंबांसमोर निवारा, रोजगार आणि उपजीविकेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून त्यांना सन्मानपूर्वक आणि कायमस्वरूपी पुनर्वसन मिळणे आवश्यक आहे.

Shobha Bachhav meet Sunetra Pawar
Dhule News | आठ हजारांवर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा कोटींची मदत, लवकरच थेट खात्यात जमा होणार: आमदार राम भदाणे

निवेदनात बाधित कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करणे, प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय गृहयोजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, धुळे महानगरपालिकेच्या उपलब्ध जागेवर बहुमजली निवासी प्रकल्प उभारणे, पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करणे तसेच यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी संबंधित विभागांकडून वस्तुस्थितीचा अहवाल मागविण्याचे निर्देश दिले. तसेच पुनर्वसनासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर झाल्यानंतर त्यावर प्राधान्याने विचार करून बाधित कुटुंबांना न्याय मिळेल अशा पद्धतीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Shobha Bachhav meet Sunetra Pawar
Dhule fire news | शिरपूर चोपडा मार्गावर ट्रक उलटून भीषण आग

याप्रसंगी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी धुळे शहरातील एकही कुटुंब बेघर राहू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी आपण शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news