Dhule fire news | शिरपूर चोपडा मार्गावर ट्रक उलटून भीषण आग

ट्रकमध्ये रसायनाचा साठा भरला असावा आणि त्यातूनच ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे
Dhule fire news | शिरपूर चोपडा मार्गावर ट्रक उलटून भीषण आग
Published on
Updated on

धुळे : शिरपूर कडून चोपडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रक उलटल्याने भीषण आग लागली. ही आग ट्रक मधील रसायनाच्या साठ्यामुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. यात ट्रकचा चालक आणि सहचालक अद्याप समोर आलेला नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत देखील चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

Dhule fire news | शिरपूर चोपडा मार्गावर ट्रक उलटून भीषण आग
Sangli Accident : शिराळा एमआयडीसीजवळ अपघातात महिलेचा मृत्यू

शिरपूर ते चोपडा मार्गावर सावेर गावा नजीक रंधे यांच्या पेट्रोल पंपाजवळ हा ट्रक उलटला आहे. ट्रक उलटल्यानंतर अचानक ट्रकने पेट घेतला. काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे या महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक रखडली. या आगीची माहिती मिळाल्याने तातडीने अग्निशमन दल आणि शिरपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत ट्रक आगीत खाक झाला होता.

Dhule fire news | शिरपूर चोपडा मार्गावर ट्रक उलटून भीषण आग
Kolhapur Accident | कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर ट्रक-कारची भीषण धडक; साताऱ्याचे कदम कुटुंब अपघातात जखमी

दरम्यान या ट्रकचा चालक आणि सहचालक यांचा शोध सुरू असून हे दोघेही अद्यापही पोलीस किंवा नागरिकांना आढळून आले नाही. त्यामुळे या दोघांबाबत देखील चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. ट्रकमध्ये रसायनाचा साठा भरला असावा आणि त्यातूनच ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे.

logo
Pudhari News
pudhari.news