Dhule Fire | शॉर्ट सर्किटमुळे ४ एकरातील ज्वारीसह पाईपलाईन जळून खाक

धुळे तालुक्यातील कापडणे येथील घटना
Jowari crop damage Dhule
Jowari crop damage DhulePudhari
Published on
Updated on

Jowari crop damage Dhule

सोनगीर (धुळे) : धुळे तालुक्यातील कापडणे येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून शेतकरी सुरेश भीमराव पाटील यांच्या ४ एकरवरील शेतातील ज्वारीचे पीक, गुरांचा चारा आणि शेतीसाठी वापरली जाणारी पाईपलाईन पूर्णतः जळून खाक झाली आहे.

या घटनेमुळे शेतकरी सुरेश भीमराव पाटील यांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून आधीच आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.

कापडणे येथील शेतकरी भीमराव सुरेश पाटील यांच्या शेतावरून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडल्या आणि त्यातून आग लागली. काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण करत संपूर्ण काढणी केलेल्या ज्वारीचे पीक भस्मसात केले. यासोबतच गुरांसाठी साठवलेला चारा आणि बांधांवरील पाईपलाईनही जळून खाक झाली.

Jowari crop damage Dhule
Dhule Fire | धुळ्यात पहाटे आगीचे तांडव; तीन दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

शेतकरी सुरेश पाटील यांनी दीड लाख रुपये खर्च करून हे पीक उभं केलं होतं मात्र अवकाळी पाऊस, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि आता या आगीत झालेल नुकसान यामुळे ते पूर्णपणे हतबल झाले आहेत. आता आणखी कर्ज घेण्याची ताकद नाही शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

घटनेनंतर तलाठी अनुपस्थित असल्याने कोतवालांनी घटनेची प्राथमिक पाहणी केली असून पंचनामा करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य नवला अण्णा पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

Jowari crop damage Dhule
Dhule Fire News | धुळ्यातील खंडेराव बाजारातील हॉटेलला भीषण आग

या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित वीज विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला जात आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी करत शेतकरी भीमराव पाटील यांनी आपले दुःख व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news