Dhule Crime | अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून; चुलत भावांना जन्मठेप

Life Imprisonment Conviction Dhule | शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
Life Imprisonment
Life ImprisonmentPudhari
Published on
Updated on

Dhule Shindkheda Life Imprisonment Conviction

धुळे : अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोन्ही चुलत भावांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांनी हा निकाल शनिवारी (दि.११) दिला.

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करताना तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी हा खून असल्याचे निष्पन्न करून गुन्हा दाखल केला. तपासात मृताचे नाव साहेबराव भिमराव मोरे (वय ४२, रा. वालखेडा) असे समोर आले.

Life Imprisonment
Dhule crime | धुळ्यात बनावट दारू तयार करणारा कारखाना उध्वस्त

सखोल तपासात मंगा उर्फ मंगेश उत्तम मोरे आणि चेतन बारकु मोरे या चुलत भावांनी संगनमताने हा खून केल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी साहेबराव यांना हरभरे खाण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून वाघाडी फाटा येथील हॉटेलवर नेले. तेथे दारू पाजल्यानंतर अकिल पिंजारी यांच्या मक्याच्या शेतात नेऊन हाताने व काठीने मारहाण करत त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह प्लास्टिक व गोधडीत गुंडाळून टाकून दिला. पुरावे नष्ट करण्यासाठी मृताचे कपडे जामफळ धरणाजवळ जाळण्यात आले.

तपासात हा खून अनैतिक संबंधाचा संशय आणि उसनवारीच्या पैशांच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गणेश वाय. पाटील यांनी एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये पंच साक्षीदार, फिर्यादी तसेच मयताची आई, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेला साक्षीदार, शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि तपासी अधिकारी यांचा समावेश होता.

Life Imprisonment
Dhule Crime | दोघा अट्टल घरफोड्यांना पाठलाग करून अटक: वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये 17 गुन्हे दाखल

पुरावे व रासायनिक विश्लेषण अहवालांच्या आधारे सरकारी पक्षाने आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने मंगेश उत्तम मोरे व चेतन बारकु मोरे यांना भादंवि कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास ठोठावण्यात आला. तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी भादंवि कलम २०१ अंतर्गत दोन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

या खटल्यात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह वाय. तवर यांचे मार्गदर्शन लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news