Dhule crime | धुळ्यात बनावट दारू तयार करणारा कारखाना उध्वस्त

दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Dhule crime | धुळ्यात बनावट दारू तयार करणारा कारखाना उध्वस्त
Published on
Updated on

धुळे : धुळ्यात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने उध्वस्त केला आहे. या कारवाईत दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील एका हॉटेलच्यामागे अंबिका नगरमध्ये एका पत्रटी शेडमध्ये बनावट दारू तयार होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळवून कारवाई करण्यासाठी एक पथक तयार केले. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे आणि पोलीस अंमलदार पवन गवळी, सचिन गोमसाळे, आरीफ पठाण, राहुल सानप देवेंद्र ठाकुर व मयुर पाटील यांनी अंबिका नगरातील या पत्रटी शेडवर छापा टाकला. यावेळी त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इम्पेरियल ब्ल्यू कंपनीची बनावट दारू तयार केली जात असल्याची बाब निदर्शनास आली.

हा बनावट कारखाना दसेरा मैदान परिसरातील सहजीवन नगरात राहणारा रविंद्र रमेश महाजन हा चालवत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. घटनास्थळावरून सुमारे 1 लाख 43 हजार 290 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात बि एन एस कलम 123, 318(4), 336(3), 349, 350(2) सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (अ) (ब) (क) (फ) (ई), 67, 83 व 86 अन्वये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news