Dhule Crime | दोघा अट्टल घरफोड्यांना पाठलाग करून अटक: वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये 17 गुन्हे दाखल

चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई, चोरीची मुद्देमाल जप्त
Chalisgaon Road Police Action
Chalisgaon Road Police Action Pudhari
Published on
Updated on

Chalisgaon Road Police Action

धुळे : बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या अट्टल दोघा गुन्हेगाराला चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून अटक केली आहे. या चोरट्याकडून चोरीस गेलेला ऐवज जप्त करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे यातील एका चोरट्याच्या विरोधात धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत.

धुळे शहरात माणिकनगर भागात राहणारे जावेद शहामद पिंजारी हे नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी सुरत येथे गेले असताना 2 अज्ञात चोरटयांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला होता. आरोपी घरात चोरी करत असल्याचे जावेद पिंजारी यांचे भाडेकरु व माणिकनगर भागातील लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी डायल 112 नंबरवरुन पोलिसांना माहिती दिली.

Chalisgaon Road Police Action
Dhule Crime | रुग्णालयातून फरार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड: कर्तव्यात कसूर करणारे २ पोलीस निलंबित

त्यानुसार रात्रगस्तीचे पोलीस घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांची चाहुल लागताच गदी, गोंधळ व अंधाराचा फायदा घेऊन 1 चोरटा घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र, दुस-या चोरटयाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले . त्याने त्याचे नाव शाहिद मुख्तार शेख, (रा. अंबिकानगर), व पळून गेलेल्या चोरट्याचे नाव रेहान खान फरीद खान पठाण ऊर्फ पोपण्या, (रा. अंबिकानगर) असे असल्याचे सांगितले.

घरमालक जावेद शाहमद पिंजारी यांनी धुळे येथे येऊन खात्री केली असता त्यांचे घरातील रोख रक्कम 3, लाख 45 हजार रुपये व 5 ग्रॅमच्या सोन्याच्या तुकडयाची चोरी झालेली होती. त्यावरुन चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

Chalisgaon Road Police Action
Dhule Crime | खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी रुग्णालयातून फरार; एका महिन्यात दुसऱ्यांदा घटना

चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी या गुन्हयाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे व शोध पथकातील अंमलदार अविनाश वाघ, अमोल पाटील, शोएब बेग, आतिक शेख यांना आदेश देऊन पोपण्या याचा शोध घेण्यास सांगितले. शोध पथकाने गोपनीय बातमीच्या आधारे पारोळा रोडवरील अन्वर नाल्याचे बाजुच्या काटेरी झुडुपातुन पाठलाग करुन रेहान खान फरीद खान पठाण ऊर्फ पोपण्या यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हयाची कबुली दिली.

आरोपी रेहान खान ऊर्फ पोपण्या याची घरझडती घेतली असता त्याचे घरात फिर्यादी यांचे मुळ आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुक तसेच 2 अॅण्ड्राईड मोबाईल फोन, एक तलवार व एक चोरीची मोटार सायकल मिळून आली. तसेच आरोपी पोपण्या याने गुन्हयात चोरलेल्या रक्कमपैकी 25 हजार 500 रुपये काढून दिलेले आहे.

आरोपी रेहान खान फरीद खान पठाण ऊर्फ पोपण्याविरुद्ध धुळे शहरातील वेगवेगळया पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news