Dhule Politics | धुळ्याचे पहिले महापौर भगवान करनकाळ यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

काही महिन्यांपूर्वी करनकाळ यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला रामराम
पहिले महापौर भगवान करनकाळ यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला
पहिले महापौर भगवान करनकाळ यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाPudhari
Published on
Updated on

Bhagwan Karankal Joins Shiv Sena

धुळे : धुळे शहराचे पहिले महापौर भगवान करनकाळ यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

काही महिन्यांपूर्वी करनकाळ यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला रामराम ठोकला होता. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे धुळेकरांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

पहिले महापौर भगवान करनकाळ यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला
Dhule News | नियमित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी अडचणीत

या प्रवेशावेळी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राजन साळवी, पक्ष प्रवक्त्या शायना एनसी, धुळे लोकसभा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख संजय वाल्हे, उपजिल्हाप्रमुख समाधान शेलार, उपमहानगरप्रमुख दिगंबर चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी भांग्या मारुती व्यायामशाळेच्या वतीने केतन जगताप, बापू बागूल, संजय कोठावदे, राहुल बडगुजर, उमेश अग्रवाल, संदीप साळुंखे, छोटू मराठे, विजय चौधरी, अनिल चौधरी, यशवंत देवकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार केला. तसेच तिळवण तेली समाज, धुळे जिल्ह्याच्या वतीने भटू चौधरी, महादू चौधरी, आनंदा करनकाळ, भिका चौधरी, रवींद्र चौधरी, टिनू सूर्यवंशी, संजय चौधरी (नंदुरबार) आदींनीही सत्कार केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news