Dhule news | इंधन बचतीचा अनोखा धुळे पॅटर्न; भाजपचे ६० नगरसेवक होणार ई-बाईक वर स्वार

हा पॅटर्न देशभरात कौतुकास्पद ठरेल, असा विश्वास शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला
Dhule news | इंधन बचतीचा अनोखा धुळे पॅटर्न; भाजपचे ६० नगरसेवक होणार ई-बाईक वर स्वार
Published on
Updated on

धुळे : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीसाठी काटकसर आणि आर्थिक स्वावलंबनाविषयी आवाहन केले होते. त्यानुसार धुळे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने इलेक्ट्रिक बाईक खरेदी करून त्यांचा वापर करावा, अशी माझी इच्छा होती. त्या इच्छेला मान देत भाजपच्या सर्व नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी ६० इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्या. सर्व नगरसेवकांनी सकारात्मक आणि ऐतिहासिक प्रतिसाद दिल्याने इंधन बचतीचा हा धुळे पॅटर्न देशभरात कौतुकास्पद ठरेल, असा विश्वास शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला.

Dhule news | इंधन बचतीचा अनोखा धुळे पॅटर्न; भाजपचे ६० नगरसेवक होणार ई-बाईक वर स्वार
Goa Dr. Ketan Bhatkar |फोंड्यातील डॉ. केतन भाटकर यांचे आमदारकीचे स्वप्न राहिले अपुरे

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे जगभरात इंधन पुरवठ्याचे संकट उभे राहिले असून, गॅस, पेट्रोल, डिझेल आदी इंधनाच्या पुरवठा साखळीत मोठा अडथळा येत आहे. या परिस्थितीत परकीय चलन साठ्यावरही ताण येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसर आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सात आवाहने केली होती.

Dhule news | इंधन बचतीचा अनोखा धुळे पॅटर्न; भाजपचे ६० नगरसेवक होणार ई-बाईक वर स्वार
Inflation crisis | महागाईचे सावट

पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात येथील महापालिकेच्या ६० नगरसेवकांनी इंधनाची बचत करण्यासाठी स्वखर्चाने इलेक्ट्रिक बाईक (ई-बाईक) वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत चेतक कंपनीच्या शोरूममध्ये या ई-बाईक वितरणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते.

Dhule news | इंधन बचतीचा अनोखा धुळे पॅटर्न; भाजपचे ६० नगरसेवक होणार ई-बाईक वर स्वार
Imtiaz Jaleel |इम्तियाज जलील यांना कचऱ्याच्या कंत्राटदाराला ब्लॅकमेल कराचे का?

यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समितीच्या सभापती लताबाई सोनार, गटनेत्या किरण कुलेवार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्व महिला, पुरुष नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dhule news | इंधन बचतीचा अनोखा धुळे पॅटर्न; भाजपचे ६० नगरसेवक होणार ई-बाईक वर स्वार
Bike Taxi Ban: राज्यातील Ola, Uber आणि Rapido बाइक टॅक्सी चालकांना मोठा धक्का; सरकारने परवाने केले रद्द

इंधन बचतीला अनोखा प्रतिसाद : मंत्री रावल

पालकंमत्री रावल म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला हा अनोखा प्रतिसाद देशभरातील लोकप्रतिनिधींसाठी आचरणाचा ठरणार आहे. देशाच्या संकटकाळात जबाबदार जीवनशैलीचा अंगीकार हा फक्त भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ताच करू शकतो, याचे आदर्श उदाहरण आमदार अग्रवाल व नगरसेवकांनी घालून दिले आहे. या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.

Dhule news | इंधन बचतीचा अनोखा धुळे पॅटर्न; भाजपचे ६० नगरसेवक होणार ई-बाईक वर स्वार
Epstein Files Controversy: भारत-अमेरिका व्यापार करार अन्‌‍ ‘एपस्टीन फाईल्स‌’ने गाजले अधिवेशन

विरोधकांच्या डोक्यातच कचरा : आ. अग्रवाल

आमदार अग्रवाल म्हणाले की, महापालिकेचे भाजपचे सर्व नगरसेवक व काही पदाधिकारी ६० इलेक्ट्रिक बाईक आज ताब्यात घेत असल्याचे पाहून विरोधकांना आज पुन्हा पोटशूळ उठला. त्यांनी नेहमीप्रमाणे धुळे महापालिकेच्या कचरा ठेकेदाराने या बाइक खरेदी करून सर्व नगरसेवकांना दिल्याची आवई उठविली. तुमच्यासारख्या कचरा भरलेल्या डोक्यातून असेच विचार येणार, हे सर्वांना माहिती आहे. कचरा ठेकेदाराकडून तुमची तोडीपाणी होत नसल्याने तुम्ही सतत खोटे-नाटे आरोप करत आहात. खरे तर सर्व नगरसेवकांनी स्वखर्चाने या बाइक खरेदी केल्या आहेत. यातील काही नगरसेवकांनी फायनान्स कंपनीचे कर्ज काढून ही बाइक घेतली आहे. यामध्ये फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे. हा भारतातील पहिलाच उपक्रम ठरला असून, तो अभिनंदनीय आहे, असेही आमदार अग्रवाल यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news