Dhule News | महापलिकेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा आ. फारुख शाह यांचा इशारा

Dhule News | महापलिकेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा आ. फारुख शाह यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा– धुळे महानगरपालिका जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत धुळ्याचे एम आय एम चे आमदार फारुख शाह यांनी महानगरपालिकेला इशारा दिला आहे. समस्यांचे निराकरण करण्यात यावे अन्यथा जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात धुळे महानगरपालिका प्रशासनाला प्रश्न आमदार फारुक शहा यांनी जनतेच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. धुळे महानगरपालिकेचा कार्यभार स्विकारल्यापासून धुळे मनपा आयुक्त म्हणून आयुक्तांची कारकीर्द निष्क्रियतेची राहिली आहे. पाण्याचे मुबलक स्त्रोत असतांना १० ते १२ दिवसांनी नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.

शहरातील चौका –चौकात साचलेले कच-याचे ढीग, रोज रात्री पसरणा-या अंधाराच्या साम्राज्यामुळे होणा-या चो-या, रस्त्यावरील अतिक्रमण, तुंबलेले नाले आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठाण मांडून बसलेले गुरे-ढोरे या व इतर नागरी समस्यांची सोडवणूक करण्यात आयुक्त अमिता दगडे पाटील आणि पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. असा आरोप आमदार शाह यांनी केला आहे. गेल्या वर्षी प्रचंड गाजा वाजा करून नाल्या काठचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. मात्र मलबा उचलण्यात आलेला नाही. आजही तीच परिस्थिती आढळून येते. पंधरा दिवसात पावसाला सुरु होणार आहे. पालिकेच्या निष्क्रीयतेमुळे नाल्या काठावर राहणा-या नागरिकांना पुन्हा भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. पावसाळापुर्व नाले सफाईची कामे अत्यंत गतीने करणे आवश्यक असतांना मात्र पालिका कासवगतीने काम करीत आहे. यासंदर्भात वेळोवेळी लेखी तक्रारी व तोंडी सुचना याबाबतीत करण्यात आल्या मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांचा मनपा अधिकारी व कर्मचारीवर्गावर वचक राहिलेला नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्या ऐवजी ठेकेदारांचे जुनी देयके देण्यात आयुक्तांना अधिक स्वारस्य दिसून येते. अशी टीका देखील या पत्रात करण्यात आली आहे. सर्व प्रकारामुळे धुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलीन होत आहे.

या समस्यांची येत्या १५ दिवसात सोडवणूक करावी अन्यथा मनपा प्रशासनाच्या अकार्यक्षमते विरोधात जन आक्रोश मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news