Eco-friendly Ganeshotsav dhule: विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करण्याचे धुळे मनपाचे आवाहन

शाळांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रेरित करून विविध उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करावे
Dhule map
Dhule map
Published on
Updated on

धुळे : माझी वसुंधरा अभियानांतर्गत धुळे महानगरपालिका ‘पर्यावरणपूरक धुळे’ या संकल्पनेकडे वाटचाल करीत असून यावर्षीचा गणेशोत्सव ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या उपक्रमात शाळा व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन धुळे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Dhule map
Dhule Ganja News: शिरपूरच्या जुनापाणी शिवारात वनजमिनीवर कापसाच्या आड गांजाच्या रोपांची लागवड

‘पर्यावरणपूरक धुळे’ आणि ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या संकल्पना यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांचा कृतीशील सहभाग महत्त्वाचा आहे. त्यानुसार शाळांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रेरित करून विविध उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करावे.

Dhule map
Dhule News : जेल रोडवर संविधान जागर समितीचे आंदोलनासाठी उभारलेले शेड, पत्र्याची खोली जमीनदोस्त

विद्यार्थ्यांनी घरी गणेशमूर्तीची स्थापना करताना पालकांना शाडू मातीची मूर्ती घेण्यासाठी आग्रह करावा. गणेशमूर्तीची सजावट करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा तसेच प्लास्टिक, थर्माकॉल, फायबर यांसारख्या पर्यावरणास घातक साहित्याचा वापर टाळावा. सजावटीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे संदेश प्रदर्शित करावेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत वृक्षारोपण, परिसर स्वच्छता यांसारखे पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत. उत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे घरच्या परिसरात कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करावे. तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन घरच्या बादलीमध्ये अथवा महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडातच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dhule map
Dhule News: धुळे जिल्ह्याचे 21.60 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

उत्कृष्ट सहभागासाठी बक्षिसे

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना व शाळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महानगरपालिकेतर्फे सर्वोत्कृष्ट सहभाग नोंदविणाऱ्या शाळांना प्रथम क्रमांकासाठी १०,००० रूपये , ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ७,००० रूपये , ट्रॉफी व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी ५,००० रूपये , ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी ३,००० रूपये , ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक घरचा गणपती उपक्रमासाठी प्रथम क्रमांक ५,००० रूपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ३,००० रूपये , ट्रॉफी व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक २,००० रूपये , ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी १,००० रूपये , ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Dhule map
Dhule News: धुळ्याच्या पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे लाचखोर उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई गजाआड

धुळे शहर स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी शाळा, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ उपक्रमात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन धुळे महानगरपालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news