धुळे : पुढारी वृत्तसेवा-धुळे तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीरींचा लाभ प्रत्येक गावातील पात्र शेतकर्यांना देण्यात यावा, तसेच गाय गोठ्यांचाही लाभ जास्तीत शेतकर्यांना दिला जावा, अशा सूचना आ.कुणाल पाटील यांनी बैठकित दिल्या. दरम्यान सिंचन विहीरींची वैयक्तीक लाभार्थी शेतकर्यांची मंजुर प्रक्रीया अंतिम टप्प्यात आली असून त्यासाठी स्थळ पहाणी करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यात त्रुटी असलेल्या शेतकर्यांनी त्वरीत त्रुटी पूर्तता करुन घ्यावी असेही आ.कुणाल पाटील यांनी बैठकीत सांगितले.
धुळे तालुक्यातील शेतकर्यांना सिंचन विहीरी व गाय गोठ्यांचा लाभ मिळावा म्हणून आ.कुणाल पाटील यांच्या प्रमुख उस्थितीत पंचायत समितीचे अधिकारी आणि भूजल सर्व्हे कार्यालयाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी धुळे तालुक्यातील सिंचन विहीरी आणि गाय गोठ्यांच्या दाखल प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. धुळे तालुक्यातील शेतकर्यांचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावे आणि त्यांच्या जीवनात समृध्दी यावी यासाठी आ.कुणाल पाटील यांनी नेहमीच सिंचनाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. धुळे तालुक्यांच्या जास्तीत जास्त शेतकर्यांना सिंचन विहीरी व गायगोठ्यांचा लाभ मिळावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी घेतलेल्या बैठकित अधिकार्यांना सूचना दिल्या. सिंचन विहीरींची मंजुरी प्रक्रिया युध्दपातळीवर करण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील बैठकित दिल्या. एकूण 1068 प्रस्ताव सिंचन विहीरींसाठी पात्र झाले असून त्यांचे स्थळ निरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान तांत्रिक त्रुटी असलेल्या शेतकर्यांना त्रुट्या कळवून कागदपत्रांची तत्काळ पूर्तता करण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत. तर शेतकर्यांनीही लवकरात लवकर त्रुटी पूर्ण करुन घ्यावत असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे धुळे तालुक्यात पशुपालनचा दुय्यम व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे गाय गोठ्यांचीही मोठी मागणी शेतकर्यांकडून असते. धुळे तालुक्यात एकूण 2294 शेतकर्यांनी गोठ्यांचे प्रस्ताव दाखल केले असून छाननी अंती 2037 प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहे. सदर गाय गोठ्यांचेही स्थळनिरीक्षणाची कार्यवाही सुरु झाली आहे. दरम्यान नामंजुर प्रस्तावांच्या कागपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करुन घ्याव्यात असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले आहे.
धुळे तालुक्यातील सरसकट गावांना पात्र लाभार्थींना सिंचन विहीरींचा व गाय गोठ्यांचा लाभ द्यावा अशाा सूचना बैठकित आ.कुणाल पाटील यांनी शेवटी दिल्या. बैठकिला आ.कुणाल पाटील यांच्यासोबत गटविकास अधिकारी अकलाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,पशुधन विकास अधिकारी भालचंद्र बोरसे,भूजल सर्व्हेक्षक ललित ब्रिजलाल वाईकर,विनोद भडांगे, उपसभापती योगेश पाटील,जि.प.सदस्य अरुण पाटील,संचालक कुणाल पाटील,सागर पाटील उपस्थित होते.
हेही वाचा :