Dhule Crime News: धुळेत करन्सी डीलच्या बहाण्याने व्यापाऱ्याची लूट

पोलिसांच्या या धडक कारवाईचा या ठगांवर परिणाम झाला नसल्याचे काल झालेल्या लुटीतून दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे
Robbery Arrest
Robbery ArrestPudhari
Published on
Updated on

धुळे : एका लाखाच्या मोबदल्यात दोन लाखाच्या नोटा मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून गुजरातच्या व्यापाऱ्याची धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारातील जंगलात लूट केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अजनाळे येथील बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्याच आठवड्यात अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या ठगांना पकडण्यासाठी साक्री तालुक्यातील जामदे गावात पोलिसांनी मोठा फौजफाटा सोबत घेऊन कारवाई केली होती. पण पोलिसांच्या या धडक कारवाईचा या ठगांवर परिणाम झाला नसल्याचे काल झालेल्या लुटीतून दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.

Robbery Arrest
Dhule crime news: धुळ्यात गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची तस्करी करणाऱ्या मालेगावच्या तरुणाला अटक

धुळे तालुक्यातील अजनाळे तसेच साक्री तालुक्यातील जामदे आणि अन्य परिसरामध्ये एक लाखाच्या मोबदल्यात दोन लाख तर दोन लाखाच्या मोबदल्यात तीन लाखांची करन्सी देण्याचे रिल्स सोशल मीडियावर टाकले जातात. याबरोबरच नागमणी देणे, कमी किमतीत सोने देणे, तांब्याचे भंगार कमी किमतीत देणे, अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवुन सोशल मीडियावरून त्याची प्रसिद्धी केली जाते. या रील्स पाहून मध्य प्रदेश, गुजरात आणि दिल्ली परिसरातील व्यापारी देखील बळी पडतात. या व्यापाऱ्यांना धुळे जिल्ह्यात येण्यास भाग पाडले जाते. यानंतर त्यांना निर्जन ठिकाणी नेऊन बेदम मारहाण करून त्यांची रोकड हिसकावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Robbery Arrest
Dhule crime news: आधी अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला, मग भेटायला बोलावलं आणि...; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

या संदर्भात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावून अशा चीटिंगला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. तरीही सोशल मीडियाच्या रिल्सला बळी पडण्याची संख्या कमी होत नाही .गेल्याच आठवड्यात मध्य प्रदेशातील व्यापाऱ्याची लूट झाल्यानंतर जामदे गावात ठगांना अटक करण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली. त्याचा ठगांना धसका बसेल, अशी अपेक्षा असतानाच काल पुन्हा धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारातील जंगलात गुजरातच्या व्यापाऱ्याची लूट झाली.

Robbery Arrest
Dhule crime news | आंब्याच्या रसात गुंगीचे औषध देऊन सावत्र बापाचा मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; पीडितेची पोलिसांत तक्रार

गुजरातच्या व्यापाऱ्याची लूट

अहमदाबाद येथील ध्रुव हेमंत कुमार मोदी या व्यापाऱ्याने फेक करन्सी घेण्याची रिल्स पाहिली. या रील्स वर असलेल्या फोन नंबर वर त्यांनी संपर्क केला असता त्यांना सुरुवातीला मालेगाव येथे बोलवण्यात आले. त्यानंतर त्यांना साक्री तालुक्यातील कुसुंबा शिवारात जंगलात निर्जन ठिकाणी नेण्यात आले. यानंतर त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडील एक लाखाची रोकड आणि मोबाईल हिसकावून घेण्यात आला. यानंतर त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आले. ही घटना घडल्यानंतर ध्रुव मोदी यांनी थेट पोलीस ठाणे गाठून त्यांच्यावर झालेला प्रसंग कथन केला.

Robbery Arrest
Dhule Crime News | पित्याचा संताप की निर्दयीपणा? शिरपूरमध्ये घडली धक्कादायक घटना

गुन्हा दाखल करण्यात आला

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांनी पथकासह तातडीने घटनास्थळाकडे धाव घेऊन तपास सुरू केला. दरम्यान मोदी यांनी मारहाण करणाऱ्या आरोपींच्या केलेल्या वर्णनानुसार आरोपींची ओळख पटवली गेली. त्यानुसार शहाजी बहादूर भोसले, प्रदीप अधिकार भोसले, दीपक इरचंद उर्फ इलिचंद चव्हाण/ पवार, मनोहर कंतुलाल पवार, आशु लुकड्या पवार, शरद बहादुर भोसले, विकी भोसले यांच्यासह अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधामध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम 310 (2), 318(4), 61 (2), 352, 351( 2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news