धुळे महापालिकेला आठ महिन्यांनंतर मिळाला विरोधी पक्षनेता; शिवसेनेचे दीपक उर्फ बंटी खोपडे यांची निवड

आठ महिन्यांनंतर नियुक्ती; शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ ठरले निर्णायक
Dhule Corporation Opposition Leader Deepak Khopade
Dhule Corporation Opposition Leader Deepak KhopadePudhari
Published on: 
Updated on: 

Dhule Corporation Opposition Leader Deepak Khopade

धुळे : धुळे महानगरपालिकेला तब्बल आठ महिन्यांनंतर विरोधी पक्षनेता मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापौर मायादेवी परदेशी यांनी शिवसेनेचे नगरसेवक दीपक उर्फ बंटी खोपडे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमुळे या गटाचे संख्याबळ १३ झाले होते. दरम्यान, १० नगरसेवक असलेल्या एमआयएमनेही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याने आता या निर्णयावर पक्षाची काय भूमिका राहते, याकडे लक्ष लागले आहे.

धुळे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ५० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच, तर एमआयएमला दहा जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना एकही जागा मिळाली नव्हती. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांसह महत्त्वाची पदे भाजपकडे गेली. मात्र, विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न प्रलंबित राहिला.

Dhule Corporation Opposition Leader Deepak Khopade
Dhule News : दुष्काळ जाहीर झाला; आता प्रत्येक बाधित शेतकऱ्याला दिलासा देण्याची वेळ : राहुल नार्वेकर

या पदासाठी एमआयएमचे गटनेते अब्दुल लतीफ अन्सारी आणि शहराध्यक्ष शोहेब अन्सारी यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. महापालिकेत १० जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा असल्याचे एमआयएमकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महसूल आयुक्तांकडे आघाडीची नोंदणी केली. त्यामुळे या आघाडीचे संख्याबळ १३ झाले.

यानंतर उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढताना महापालिकेने चार आठवड्यांच्या आत विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. त्यानुसार महापौर मायादेवी परदेशी यांनी आज दीपक उर्फ बंटी खोपडे यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

Dhule Corporation Opposition Leader Deepak Khopade
Dhule Firing | धुळ्यात गोळीबारप्रकरणी आठ जणांवर गुन्हा; दोघांना अटक

नियुक्तीनंतर खोपडे यांनी शिवसेनेने आपल्यावर विश्वास दाखवत विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिल्याबद्दल पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवक व नेत्यांचे आभार मानले. "केवळ विरोधाला विरोध न करता धुळे शहराच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या नगरसेवकाची नियुक्ती झाल्यानंतर एमआयएमकडून पुढील कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news