Dhule Firing | धुळ्यात गोळीबारप्रकरणी आठ जणांवर गुन्हा; दोघांना अटक

गावठी कट्टा जप्त; शहर अवैध धंदे आणि दहशतमुक्त करण्याची मागणी
Firing
FiringPudhari
Published on: 
Updated on: 

Dhule Firing Incident

धुळे : धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळ दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील वैभव ऊर्फ गोलू संजय मेकले आणि भुपेश ऊर्फ भूषण तिलकसिंग लोधी (दोघे रा. अमरनगर) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

मनोहर टॉकीजजवळील नाटेश्वर इलेक्ट्रिक दुकानासमोरील चायनिज स्टॉलवर हर्षल दीपक गवळी हा व्यवसाय करीत असताना दुकानाचा गाळा घेण्याच्या कारणावरून आरोपींनी त्याला व त्याच्या भावाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

Firing
Dhule Crime News: धुळेत करन्सी डीलच्या बहाण्याने व्यापाऱ्याची लूट

या प्रकरणी वैभव मेकले, भावेश कौलस्कर, ऋषिकेश मोरे, भूषण लोधी, नकुल रगडे, विवेक गवळी, प्रथमेश भोंडवे आणि पंकज मेकले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, एलसीबीचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली.

Firing
Dhule crime news: आधी अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला, मग भेटायला बोलावलं आणि...; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

दरम्यान, शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी केली आहे. युवा सेनेचे पंकज गोरे, संविधान संघटनेचे आनंद लोंढे आणि भीमशक्तीचे राहुल वाघ यांनी यापूर्वी आंदोलन केले आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिस प्रशासनावर टीका होत असून, धुळे शहर अवैध धंदे व दहशतमुक्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news