धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमधील रंगाच्या कारखान्याला भीषण आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर तब्बल एक ते दीड तास प्रयत्न करून नियंत्रण मिळवले
धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमधील रंगाच्या कारखान्याला भीषण आग
Published on
Updated on

धुळे : धुळ्यातील अवधान येथील औद्योगिक वसाहती मधील रंगाच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतो आहे.

धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमधील रंगाच्या कारखान्याला भीषण आग
Chandrapur Fire News : वरोरा हादरले! रवी कमल जिनिंगला भीषण आग; १० कोटींचे पांढरे सोने खाक

अवधान येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वर्धमान पेंट्स या कंपनीला आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास आले. कारखान्यामधून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पाहून रखवालदाराने ही माहिती संबंधित अधिकारी यांना कळवली. त्यानंतर ही माहिती पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाला देण्यात आली.

धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमधील रंगाच्या कारखान्याला भीषण आग
Solapur fire: नई जिंदगी भागात भीषण आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर तब्बल एक ते दीड तास प्रयत्न करून नियंत्रण मिळवले. यासाठी पाच बंबांचा वापर करण्यात आला. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज असून या आगीत प्राणहानी झाली नसली तरीही लाखो रुपयाचे नुकसान झाल्याच्या अंदाज व्यक्त होतो आहे. या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news