Dhule crime news: आधी अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला, मग भेटायला बोलावलं आणि...; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा खळबळ जनक प्रकार धुळ्यातील साक्री रोड परिसरात घडला. या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Dhule crime news

धुळे: मोबाईलच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीबरोबर जवळीक साधून तिचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्यात आला. या नंतर ही माहिती सार्वजनिक करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा खळबळ जनक प्रकार धुळ्यातील साक्री रोड परिसरात घडला. या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील साक्री रोड परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुली समवेत तिची इच्छा नसताना मोबाईलच्या माध्यमातून चाळीसगाव रोड परिसरात राहणाऱ्या रेहान शहा याने जवळीक वाढवली. यानंतर या मुलीला त्याने व्हिडिओ कॉल करून हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला. यानंतर त्याने या व्हिडिओ कॉलचा आधार घेत पिडीतेला धमकावण्यास सुरुवात केली.

Crime News
Beed Crime | व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत केजमध्ये अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

ही माहिती सार्वजनिक करण्याची धमकी देत असतानाच त्याने परिवारातील सदस्यांना ठार करण्याची धमकी सुद्धा दिली. त्यामुळे ही पिडीता कमालीची घाबरली. याच दरम्यान या आरोपीने तिला साक्री रोड परिसरातील सत्यसाईबाबा वसाहती मधील एका रिक्षा स्टॉप जवळ भेटायला बोलावले. तेथे त्याने पीडित मुलीबरोबर लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिडीतेने हा प्रकार हाणून पाडला.

ही माहिती तिच्या नातेवाईकांना कळाल्याने त्यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करीत रेहान शहा याला ताब्यात घेतले. दरम्यान संशयीत आरोपीला शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मोठा जमाव गोळा झाला. शहर पोलीसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेचे कलम 74, 75, 351(२) (3), सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंधक अधिनियम कलम 8, 12 व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Sangli minor harassment: पाठलाग करून अल्पवयीन मुलीची छेडछाड; विरोधानंतर मारहाण, धमकी
Crime News
Crime News: डोंबिवलीत लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या दोन्ही मुली गर्भवती; दोघांना बेड्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news