Dhule Double Murder Case | माजी नगराध्यक्षांसह 11 जणांना जन्मठेप

Dhule Double Murder Case | धारदार शस्त्राने वार करीत बाप -लेकाची हत्या करणाऱ्या माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह ११ जणांना गुरुवारी (१२) सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धारदार शस्त्राने वार करीत बाप -लेकाची हत्या करणाऱ्या माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह ११ जणांना गुरुवारी (१२) सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यातून एका आरोपीला निर्दोष सोडले. अन्य एकाला पाच वर्षांची शिक्षा सुनावली.

Arrested
IMD Nashik Heatwave | उष्माघाताचा धोका वाढला! मार्चमध्येच पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर; यंदाचा उन्हाळा ठरणार जीवघेणा?

धुळ्यातील देवपूर भागात ८ जून २०१८ रोजी सायंकाळी हे हत्याकांड घडले होते. होळीसाठी पवनपुत्र व्यायाम शाळेसमोर होळीचा दांडका गाडायचा कार्यक्रम होणार होता. यासाठी फिर्यादी प्रशांत पाटील तसेच रावसाहेब पाटील हे दोघे गेले होते.

त्यावेळी आरोपींनी वाद घालत काटा काढण्याची धमकी दिली होती. यासह बाळापूर ग्रामपंचायत निवडणुकीत रावसाहेब पाटील याने बाजीराव पवारच्या पॅनलविरोधात काम केले होते. त्यातूनच ८ जून २०१८ रोजी सायंकाळी आरोपींनी रावसाहेब पाटील व वैभव पाटील यांच्यावर कुकरी, तलवार, कोयता अशा हत्याराने वार केले होते.

Arrested
Nashik GST Officers Bribe Case | जीएसटी अधिकाऱ्यांसह तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन साक्षीदार तपासले. या खटल्याचे काम जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्यासमोर झाले. सरकार पक्षातर्फे ३२ साक्षीदारांची साक्ष सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी घेतली. या खटल्यात साक्षीदाराची साक्ष, अभिलेखावर असलेल्या रासायनिक विश्लेषणाच्या अहवालानुसार आरोपींना फाशी अथवा दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद करण्यात आला.

यांना झाली शिक्षा

बाजीराव पवार, भूपेश पाटील, हर्षल पाटील, जयराज पाटील, हृषिकेश पाटील, दर्शन परदेशी, भगवान अहिरे, अर्जुन अहिरे, गौरव पवार, भूषण कापकर, भूषण पगारे यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा तसेच १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news