IMD Nashik Heatwave | उष्माघाताचा धोका वाढला! मार्चमध्येच पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर; यंदाचा उन्हाळा ठरणार जीवघेणा?

IMD Nashik Heatwave | उकाड्याने लाहीलाही : तापमान ३८.५ अंश सेल्सिअस
IMD weather update, Heatwave, Maharashtra
राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. (AI Image)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मार्च महिन्याच्या मध्यातच नाशिकचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने, यंदाचा उन्हाळा हा जीवघेणा ठरण्याचे संकेत आहेत. गुरुवारी (दि.१२) शहरातील तापमानाची ३८.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली.

IMD weather update, Heatwave, Maharashtra
Nashik Crime | देवळा येथे पोलिस असल्याचे भासवून 11 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, मारहाणीत व्यापाऱ्याचा मृत्‍यू

उन्हाच्या झळा इतक्या तीव्र होत्या की, घराबाहेर पडणाऱ्या नाशिककरांची लाहीलाही झाल्याचे दिसून आले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्र आणि गुजरातवर जास्त दाबाची स्थिती (अँटिसायक्लोनिक) सक्रिय आहे.

यामुळे हवामान कोरडे झाले असून, तापमानात मोठी वाढ होत आहे. याचा फटका केवळ विदर्भालाच बसला नसून, उत्तर महाराष्ट्रही ४० अंशांच्या उंबरठ्यावर आहे. थंड हवेसाठी ओळखले जाणारे नाशिकही चांगलेच तापले असून, कमाल तापमानाने या हंगामातील सर्वोच्च स्थिती गाठली आहे.

IMD weather update, Heatwave, Maharashtra
Nashik news | चांदवड शहरात दोन बिबट्यांचा थरार; डुकरावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे पहाटेचा अपवाद वगळता, इतरवेळी हवामानात उष्णता असल्याने, नाशिककरांना उकाड्याचा भारतीय हवामान विभागाच्या मते,

पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज असल्याने, नाशिकचे तापमान मार्च महिन्यातच ४० अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे आजारपणांमध्येदेखील वाढ झाली आहे. तापमान वाढल्यास उष्माघाताचे रुग्ण पुढे येण्याची शक्यता असल्याने, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news