Dhangar Reservation Protest | धनगर आरक्षणासाठी धुळ्यात समाजाचा एल्गार; मुंबईत आंदोलनाचा इशारा

हजारोंच्या सहभागाने महामोर्चा; अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी
Dhule Dhangar Protest
Dhule Dhangar ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

Dhule Dhangar Protest

धुळे : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी धुळे शहरात महामोर्चा काढण्यात आला. हजारो समाजबांधवांच्या सहभागातून निघालेल्या या मोर्चाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. धुळ्यातील हा मोर्चा केवळ सुरुवात असून, मागणी मान्य न झाल्यास मुंबईत भव्य आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून मोर्चाला सुरुवात

धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून महामोर्चाला सुरुवात झाली. कराचीवाला खुंट, जुनी महापालिका आणि नवीन महापालिका मार्गे हा मोर्चा क्युमाईन क्लबजवळ पोहोचला. तेथे मोर्चाचे रूपांतर महामेळाव्यात झाले.

Dhule Dhangar Protest
Dhule News : लोंढे नाल्याजवळ अपघात झाल्याने नागरिकांचा रास्ता रोको, आमदार राम भदाणे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

या मोर्चाचे नेतृत्व दीपक बोऱ्हाडे, सुनील वाघ आणि गोपाल माने यांनी केले. मोर्चात मच्छिंद्र बिडकर, नगरसेवक अमोल मासुळे, नगरसेवक निलेश नेमाणे, गोपी लांडगे, गणेश गर्दे, बी. एन. पाटील, आप्पा खताळ, विनोद खेमणार, मनोज कोळेकर, गोरख पाटील, विठ्ठल मारनर, लखन रुपनर, राजेंद्र गर्दे, कैलास गर्दे, दीपक शेंडगे, चेतन पाटील, किशोर सरगर, बाळू शेंडगे, विजय तमनर (अहिल्यानगर), अशोक पातोंडे (अकोट), नथ्थू धनगर (कल्याण), डॉ. प्रकाश मोरे, सुभाष शिंदे, रामचंद ठाकरे, लखन गोराड, शितल चिंचोरे (म्हसावद), ज्ञानेश्वर परदेशी, जिभाऊ पाटील, शैलेंद्र आजगे, प्रमोद धनगर, छगन बागुल, बापू बागुल आणि विलास धनगर यांच्यासह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘धनगड आणि धनगर एकच’ असल्याचा पुनरुच्चार

क्युमाईन क्लबजवळ झालेल्या महामेळाव्यात दीपक बोऱ्हाडे यांनी समाजबांधवांना संबोधित केले. केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातींच्या यादीत ‘धनगड’ या जमातीचा समावेश असल्याचा उल्लेख करत धनगड आणि धनगर एकच असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या मागणीसाठी न्यायालयीन लढा सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Dhule Dhangar Protest
Dhule Jamphal PDN scheme Shindkheda| पिढ्यान्पिढ्यांचा दुष्काळ संपला! तापी नदीचे पाणी पोहोचणार शिंदखेड्याच्या शिवारात

आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर आरक्षणाबाबत आश्वासने दिली होती. मात्र, अद्याप या मागणीची पूर्तता झालेली नसल्याने समाजात नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तातडीने मिळावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारने मागणीची दखल न घेतल्यास मुंबईत मोठ्या संख्येने धडक देत आंदोलन करण्यात येईल. गरज पडल्यास दिल्लीमध्येही आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका महामोर्चातून मांडण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news