Dhule crime: बनावट विदेशी दारुचा ७२.८८ लाखांचा साठा जप्त; एकाला अटक

घटनास्थळावरून ६५५ खोके, ३१ हजार ४४० बाटल्या व वाहन ताब्यात घेण्यात आले आहे
Dhule crime: बनावट विदेशी दारुचा ७२.८८ लाखांचा साठा जप्त; एकाला अटक
Published on
Updated on

अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर : मानवी जीवितास अपायकारक व घातक असलेल्या बनावट विदेशी दारूचा साठा विक्रीच्या उद्देशाने वाहनात लपवून ठेवल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखा व साक्री पोलिसांच्या संयुक्त पथकाने केला. साक्री तालुक्यातील लघळवाड येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल ७२ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राकेश धनलाल भोये (२६) रा.धनखडी, पारगाव,ता.साक्री याला अटक करण्यात आली आहे.

Dhule crime: बनावट विदेशी दारुचा ७२.८८ लाखांचा साठा जप्त; एकाला अटक
Dhule crime: ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न; जाब विचारताच दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना लघडवाळ गावातील एका घरासमोर उभ्या असलेल्या वाहनात बनावट विदेशी दारूचा साठा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीची खातरजमा करून एलसीबी व साक्री पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. या कारवाईत संशयित राकेश भोये याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बनावट विदेशी दारूने भरलेले ६५५ खोके आढळून आले.

Dhule crime: बनावट विदेशी दारुचा ७२.८८ लाखांचा साठा जप्त; एकाला अटक
Dhule Crime : हुंड्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या पतीसह चौघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

या खोक्यांमध्ये एकूण ३१ हजार ४४० काचेच्या बाटल्या (किंमत ६२ लाख ८८ हजार रुपये) असल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच दहा लाख रुपये किंमतीचे वाहन (एमएच ०८, एच-२१०९) असा एकूण ७२ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त करण्यात आलेली दारू विना परवाना, विना बॅच तसेच मॅन्युफॅक्चर नंबर नसलेली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Dhule crime: बनावट विदेशी दारुचा ७२.८८ लाखांचा साठा जप्त; एकाला अटक
Dhule Crime| धुळ्यात एमडी ड्रग्ससह अवैध दारूसाठा जप्त; दोघांवर गुन्हे दाखल

मानवी आरोग्यास व जीवितास धोका निर्माण होऊ शकणाऱ्या या बनावट दारूचा बेकायदेशीर साठा करून तो विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात राकेश भोये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १२३,३३६ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दारूचा हा साठा नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा पुरवठादार कोण आणि तो कुठे वितरित केला जाणार होता, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Dhule crime: बनावट विदेशी दारुचा ७२.८८ लाखांचा साठा जप्त; एकाला अटक
Dhule Crime | धुळे जिल्ह्यातून १२ सराईत गुन्हेगार हद्दपार; पिस्तूल बाळगणारे दोघे नवलनगरजवळ जेरबंद

पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व पोलीस उपअधीक्षक सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, साक्री पोलीस ठाण्याचे दीपक वळवी, सहायक निरीक्षक दीपक ढोके, पोलीस उपनिरीक्षक अशोक वळवी, पोलीस अंमलदार तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, राजीव गिते, सुशील शेंडे, संजय शिरसाट, शांतीलाल पाटील, दिनेश मावची, रोशन चित्ते, तुषार जाधव, विकास शिरसाट व नारायण चव्हाण यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news