वृक्षारोपण करतांना मियावाकी पद्धतीचा वापर करावा. मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीसाठी गाव तेथे मियावाकी, ग्रामपंचायत, गायरान जमीन, पडीक जमीन, सरकारी शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, नगरपालिकेच्या मोकळ्या जागेचा वापर करावा. त्याचप्रमाणे वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक गावात बिहार पॅर्टन, अकोला पॅटर्न, कन्या वन समृद्धी योजनाच्या माध्यमातून वृक्षारोपन करावे, बांबु लागवडीसाठी तसेच कृषी विभागाने मनरेगा अंतर्गत तसेच विविध योजनेतंर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत करावेत. तसेच वृक्षारोपणासाठी विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उपजिल्हाधिकारी (रोहयो) मुंडावरे यांनी यावेळी पीपीटीद्वारे माहिती दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.