धुळे : महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे ब्रॅन्डींग करावे : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे ब्रॅन्डींग करावे : जिल्हाधिकारी अभिनव गोयल
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा; महिला बचतगटामार्फत उत्पादित केलेले पदार्थ दर्जेदार असतात. परंतु महिला बचतगट ब्रॅन्डींग आणि पॅकेजिंगमध्ये कमी पडत असून बचतगटांनी उत्पादित केलेल्या पदार्थांचे ब्रॅन्डींग व पॅकेजिंग करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच नवतेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीचे उद्धटन जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास नाबार्डचे सहायक महाप्रबंधक अभिजीत रांजणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.दिनेश नांद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, जिल्हा मानव विकास समितीचे जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, महिला बचतगटात महिला संघटीत होवून एखादा उद्योग सुरु करतात परंतू त्यांच्या पदार्थ व वस्तुंना योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी त्यावस्तुंची ब्रॅन्डींग होणे गरजेचे आहे. बाजारात, सुपरशॉपमध्ये एखादी वस्तु आपण घ्यायला गेलो की, ती वस्तु चांगल्या पॅकींगमध्ये असल्यावर तीच वस्तु आपण सहज घेतो. त्यामुळे बचतगटांनी वस्तुच्या पॅकींगकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य योजना तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पीएमजीसी, सीएमजीसी योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून 25 लाखापर्यंतचे कर्ज मिळते अशा योजनांचा लाभ घेऊन बचतगटांनी आपल्या वस्तुची बॅन्डींग व पॅकेजींग करुन विक्री करावी. जेणेकरून आपण इतर मार्केटमधील पदार्थाच्या स्पर्धेत उतरु शकतो असेही त्यांनी सांगितले.

महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न देखील करीत आहे. यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे मोठे योगदान आहे. महिलाच्या सक्षमीकरणासाठी बचतगटाची स्थापना करुन त्यांना विविध प्रकारच्या मदतीच्या माध्यमातून उद्योग निर्माण करुन देणे हे काम माविम मार्फत होते. ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून उमेद मार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा बचत गटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दिशा वनधन विकास केंद्र, स्वउन्नती दिव्यांग बचत गट, दुर्गा बचत गट, समर्थ कृपा बचत गट, उन्नती लोकसंचलित साधन केंद्र, कामधेनु स्वयंसहायता गट, नवनिर्मिती बचत गट, आधार लोक संचलित साधन केंद्र, समृद्धी बचत गट, कौशल्य बचत गट, भाग्यश्री बचत गट, उत्कर्ष बचत गट, हिंगलाज माता बचत गट, कोहिनूर बचत गट आदी बचत गटांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनात प्रामुख्याने दीपावलीसाठी लागणारे साहित्य फराळ, पापड, धूपबत्ती, कपडे, घर सुशोभीकरणासाठी लागणारे साहित्य इत्यादींचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी बचतगटाच्या स्टॉलला भेट दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर यांनी तर सूत्रसंचालन भूषण ब्राह्मणे तसेच आभार प्रदर्शन जिल्हा सह नियंत्रण अधिकारी मिलिंद पाटील यांनी केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news