

Dhule Brahmin Samaj Protest
धुळे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सकल ब्राह्मण समाज, श्री भगवान परशुराम युवा मंच, सखी मंच आणि श्री भगवान परशुराम चौक समिती यांच्या वतीने जेलरोड परिसरात तीन तासांचे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. तसेच समाजातील लहान मुलींच्या हस्ते आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनाची सुरुवात मृत बालिकेला श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर मोठ्या संख्येने समाजबांधवांनी धरण्यात सहभाग घेतला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, विशेषतः फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय शक्ती कायदा लागू करावा आणि प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात सीए राजाराम कुलकर्णी, डॉ. महेश घुगरी, व्यावसायिक केदार जोशी, माधव बापट, नाना शुक्ल, युवा मंचाचे भूषण जोशी, चौक समितीचे अनिल दीक्षित, सखी मंचाच्या रेखा कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, घनश्याम जोशी, राहुल याज्ञिक, अॅड. प्रसाद देशमुख, मनीषा जोशी, भारती जोशी, अश्विनी जोशी, वासंती दीक्षित, मीरा दैव, योगिता कुलकर्णी, जागृती पंचभाई, सुभाष जोशी, विलास जोशी, मयूर कुलकर्णी, प्रथमेश काटे, गिरीश कुलकर्णी, निलेश जोशी, क्षमा दीक्षित, ज्योती कुलकर्णी, अश्विनी शुक्ल, अपर्णा कुलकर्णी, दिनेश निमोणकर, दिनेश शर्मा, शेखर कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी, यश कुलकर्णी, पुष्कर दीक्षित, प्रतीक घोलप यांच्यासह अनेक समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
आंदोलनानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक समाजबांधव उपस्थित होते. माजी नगरसेविका आरती पवार, अरुण पवार, भाजपचे सरचिटणीस डॉ. सुशील महाजन आणि नगरसेविका डॉ. निशा महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
धुळे : नसरापूर येथे चार वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) धुळे शाखेतर्फे महात्मा गांधी स्मारक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी केले.
यावेळी अभाविप धुळे शहर मंत्री मयुरी जाधव, मयुरी ढिवरे, मनिष कुलकर्णी, जयेश मोरे, केदार जोशी, प्रिया जैन सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.