Dhule Dog Shelter Project | धुळ्याच्या अवधान शिवारात डॉग शेल्टर प्रकल्प; भटक्या कुत्र्यांचे होणार व्यवस्थापन

आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन
Stray Dog Management Dhule
आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते डॉग शेल्टर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.Pudhari
Published on
Updated on

Stray Dog Management Dhule

धुळे : धुळे येथील अवधान शिवारात शेल्टर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.

धुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास, विशेषतः लहान मुलांवर होणाऱ्या चाव्यांच्या तक्रारी गंभीर स्वरूपात समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून अवधान येथे आधुनिक डॉग शेल्टर उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Stray Dog Management Dhule
Dhule News : धुळे जिल्ह्यासाठी 'मुख्यमंत्री सहायता निधी' ठरतोय देवदूत; २५२ रुग्णांना २.१९ कोटींची मदत!

अवधान येथील सर्व्हे नंबर ६२/१ येथे या डॉग शेल्टर प्रकल्पाचे भूमिपूजन विधीवत पार पडले. या प्रकल्पाच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन केले जाईल, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षितता वाढेल तसेच प्राणी संवर्धनालाही चालना मिळेल. शहरात सुरक्षित, स्वच्छ आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, नगरसेविका सारिकाताई अग्रवाल, महानगरपालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत उगले, महादेव परदेशी, प्रवीण अग्रवाल, प्रफुल पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news