Dhule Court | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

चॉकलेटचे अमिष दाखवून केला होता अत्‍याचार,
Court
न्यायालय Pudhari File Photo
Published on
Updated on

धुळे : धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन बालिकेस चॉकलेटचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर धुळे येथील सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे . या खटल्यातील सरकारी वकील शुभांगी जाधव यांनी साक्ष आणि पुराव्यांचा आधार घेत आरोपी याला कठोर शिक्षेची मागणी केली. यानंतर न्यायालयाने आरोपीस जन्मठेप सुनावली आहे.

धुळे तालुक्यातील एका खेडे गावातील अल्पवयीन मुलीस २०/ सप्टेंबर २०२३ रोजी चॉकलेट देण्याचा बहाना करुन घरात बोलवून अत्याचार केला.त्याबाबतीत सोनगीर पोलीस ठाणे येथे आरोपी दिनेश गनवार उर्फ गोणार साहनी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड व सचिन कापडणीस यांनी गुन्हयाचा तपास करुन आरोपी दिनेश गनवार उर्फ गोणार साहनी विरोधात आरोपपत्र दाखल केले.

या खटल्याचे कामकाज सत्र न्यायमुर्ती श्रीमती यास्मीन देशमुख यांच्या न्यायालयात सुरु झाले असता अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती शुभांगी ज्ञानोबा जाधव यांनी सरकार पक्षातर्फे ११ महत्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. यामध्ये पिडीता व पिडीतेचा भाऊ यांची साक्ष न्यायालयात महत्वाची ठरली. तसेच सदरच्या खटल्यात सरकारपक्षातर्फे युक्तीवाद करतांना अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती शुभांगी ज्ञानोबा जाधव यांनी साक्षीदारांच्या साक्ष व त्या अनुषंगाने केलेला युक्तीवादाचा आधार घेत आरोपीला जास्तीत-जास्त शिक्षा देण्याचा युक्तीवाद केला.

त्यानुसार सत्र न्यायमुर्ती श्रीमती. यास्मीन देशमुख यांनी सर्व बांबीचा विचार करुन आरोपीस भा.द.वि. ३७६-अ, ब सह बालकांचे लैगिंक अपराधापासुन संरक्षण अधिनीयम २०१२ चे कलम ४, ६ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनवली. व तो दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनवाली. व त्या दंडाच्या रक्कमेपैकी पिडीतेस ३० हजार रुपये देण्याचा आदेश केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे श्रीमती शुभांगी ज्ञानोबा जाधव यांनी काम पाहिले. तसेच त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news