

पिंपळनेर : येथे आय.क्यू.ए.सी विभाग व तालुका विधी सेवा समिती, साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात दिवाणी न्यायाधीश कैलास टी. अढायके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
न्यायाधीश अढायके यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान आहेत. स्वातंत्र्य हे अमूल्य आहे, परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. कायद्याच्या चौकटीत प्रत्येकाने आपले व्यवहार केले पाहिजे व कायदयाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. प्रत्येक नागरिकास कायद्याचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. योगेश कासार यांनी केले. याप्रसंगी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी निलेश पाटील यांनी सायबर सिक्युरिटी या विषयावर तर अॅड. सुशील अहिरे यांनी रॅगिंग प्रतिबंधक कायदा या विषयावर सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. या जनजागृती शिबिरात न्यायालयातील कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :