नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात 12 मतदान केंद्र 

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात 12 मतदान केंद्र 

धुळे पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिंक निवडणूकीसाठी बुधवार, दि.26 जून, 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी धुळे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने 12 मतदान केंद्रांची ठिकाणे निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 3, शिंदखेडा तालुक्यात 2, साक्री तालुक्यात 2 तर धुळे तालुक्यात 5 अशा एकूण 12 मतदान केद्रांचा समावेश आहे.

असे आहेत मतदान केंद्राचे ठिकाण, मतदान केंद्राची इमारत व मतदान केंद्राचे क्षेत्र

शिरपूर तालुक्यात पी.बी.एम.हायस्कुल शिरपूर, उत्तरेकडील पुर्व पश्चिम इमारत, पुर्वेकडील खोली क्रमांक 1 मध्ये शिरपूर मतदार यादी भाग क्रमांक 11/60. पी.बी.एम.हायस्कुल शिरपूर, पुर्वेकडील उत्तर दक्षिण इमारत, उत्तरेकडील खोली क्रमांक 2 मध्ये शिरपूर मतदार यादी भाग क्रमांक 11/60. पी.बी.एम.हायस्कुल शिरपूर, पुर्वेकडील उत्तर दक्षित इमारत, उत्तरेकडील खोली क्रमांक 3 मध्ये शिरपूर मतदार यादी भाग क्रमांक 11/60 असा आहे.

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे नगर परिषद शाळा क्रमांक 10, उत्तरेकडील पूर्वमुखी खोली क्रमांक 1 मध्ये दोंडाईचा मतदार यादी भाग क्रमांक 9/60. शिंदखेडा तहसिल कार्यालय, शिंदखेडा येथे उत्तरेकडील दक्षिणमुखी खोली क्रमांक 1, तहसिलदार शिंदखेडा यांचे दालन मध्ये शिंदखेडा मतदार यादी भाग क्रमांक 10/60 असा आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे अपर तहसिल कार्यालय, पिंपळनेर तहसिलदार कक्ष मध्ये मतदार यादी भाग क्रमांक 8/60. साक्री तहसिल कार्यालय, साक्री महसुल शाखा, साक्री मध्ये मतदार यादी भाग क्रमाक 7/60 असा आहे.

धुळे तालुक्यात श्रीमती रेशमाबाई गजमल माळी प्राथमिक विद्यामंदीर, देवपूर, धुळे दक्षिणेकडील इमारत खोली क्रमांक 1 मध्ये धुळे ग्रामीण मतदार यादी भाग क्रमांक 12/60. श्रीमती रेशमाबाई गजमल माळी प्राथमिक विद्यामंदीर, देवपूर, धुळे दक्षिणेकडील इमारत खोली क्रमांक 2 मध्ये धुळे ग्रामीण मतदार यादी भाग क्रमांक 12/60. श्री.तु.ता.खलाणे महाजन हायस्कुल, देवपूर, धुळे उत्तरेकडील इमारत खोली क्रमांक 11 मध्ये धुळे शहर मतदार यादी भाग क्रमांक 13/60. श्री.तु.ता.खलाणे महाजन हायस्कुल, देवपूर, धुळे उत्तरेकडील इमारत खोली क्रमांक 12 मध्ये धुळे शहर मतदार यादी भाग क्रमांक 13/60. श्री.तु.ता.खलाणे महाजन हायस्कुल, देवपूर, धुळे पुर्वेकडील इमारत खोली क्रमांक 15 मध्ये धुळे शहर मतदार यादी भाग क्रमांक 13/60 असा आहे.

धुळे जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी आपआपल्या मतदान केंद्राची नोंद घेवून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी गोयल यांनी केले आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news