धुळे : नोकरी मागणारे न होता, नोकरी देणारे बना : नितीन गडकरी

धुळे : नोकरी मागणारे न होता, नोकरी देणारे बना : नितीन गडकरी

धुळे: पुढारी वृत्तसेवा : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विकासाच्या अनेक गाेष्टी शक्य झाल्या आहेत. त्यादृष्टीने इथाेलाॅनवर चालणारे वाहने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मदत हाेणार आहे. तसेच बांधकामासाठी फायबर स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील वस्तूच्या भाववाढीला लगाम लागणार आहे. याशिवाय तंत्रज्ञानात हाेणारे बदल उद्याेजकांपर्यंत पाेहाेचविणे गरजेचे आहे. त्याचा वापर करून युवकांनी नाेकरी मागणारे न हाेता नाेकरी देणारे व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उद्याेग प्रबोधनीच्या कार्यक्रमात व्यक्त केली.

शहरातील अग्रसेन लाॅन्स येथे झालेल्या उद्याेग प्रबाेधिनीचे उद्घाघाटन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. उद्याेग प्रबाेधिनीचे संस्थापक प्रा. प्रकाश पाठक हे अध्यक्षस्थानी हाेते. व्यासपीठावर खासदार डाॅ.सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिश पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापाैर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, भारतीय जनता युवा माेर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, माजी महापाैर चंद्रकांत साेनार,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबन थाेरात, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, प्रबाेधिनीचे हर्षल विभाडींक, श्रीराम देशपांडे आदी मान्यवर उपस्थित हाेते. याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते उद्याेग प्रबाेधिनीच्या माध्यमातून स्टार्टॲप सुरू करणाऱ्या नवउद्याेजकांचे प्रदर्शनाचे उद‌्घाटन करण्यात आले. उद्याेगक्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे. वाहनांचे इंजिनही आधुनिक आहेत. इथाेलाॅनवर चालणारे वाहने आणण्याचा प्रयत्न असून त्यासाठी नुकतेच पाणीपतमध्ये शेतातील तणापासून इथाेलाॅन निर्मिती करणारा प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे अन्नदाता शेतकरी ऊर्जादाता  बनण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन तंत्रज्ञान हे उद्याेजकांपर्यंत पाेहाेचले पाहिजे. आज स्टीलचे भाव वाढत आहे. त्यावर पर्याय म्हणून स्टील फायबर वापरण्यात येत आहे. उद्याेग उभारणीसाठी रस्ते, पाणी,वीज,टेलिकम्युनिकेश या बाबी महत्वाच्या आहेत. आज आयातनिर्यातीसाठी मुंबईला उद्याेजकांना जावे लागते. जिल्हयात रेल्वे लाईनजवळ जागा दिल्यास आयात निर्मितीसाठी मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही. स्थानिक पातळीवर त्यासाठी केंद्र सुरू करण्यात येईल असेही गडकरी यांनी सांगितले. हर्षल विभांडीक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी २०२०-२१ मध्ये २३ स्टार्टॲपसाठी उद्याेग प्रबाेधिनीच्या माध्यमातून ३ काेटीचे भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहेे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news