माकडाकडून चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, अन्… (Video) | पुढारी

माकडाकडून चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, अन्... (Video)

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

3 वर्षांची मुलगी रस्त्यावर खेळत असताना एका माकडाने तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रसंग CCTV फुटेजमध्ये कैद झाला. ते माकड चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतंय की काय? असेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटू शकते. दरम्यान, हा प्रकार पाहणा-यांनाही धक्काच बसला आहे. ही घटना चीनमधील चोंगकिंग येथे घडली. (monkey tries kidnapping little girl)

तीन वर्षांची मुलगी घराबाहेर रस्त्यावर खेळत होती. अचानक एक माकड आले आणि त्याने चिमुकलीला ओढून नेले. 19 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा व्हिडिओअ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील माकड चिमुकलीला मागून ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यानंतर लिऊ नावाच्या व्यक्तीने हा प्रसंग पाहिला आणि तत्काळ हालचाली करत मुलीचे प्राण वाचवले. लिऊच्या म्हणण्यानुसार, मला एक लहान मुलगी जिवाच्या अकांताने ओरडत असल्याचे ऐकायला आले. काहीतरी अघटीत घडत असल्याची जाणीव मला झाली. मी तत्काळ आवाच्या दिशेने धावलो. तेव्हा मला दिसले की, एक माकड लहान मुलीला ओढत आहे. त्यामुळे ती मुलगी घाबरून ओरडत होती. हे विदारक दृश्य पाहून मी धाडसाने पुढे सरसावलो आणि माकडाला हुसकवले आणि चिमुकलीला उचलून घेतले. दुदैवाने माकडाने मुलीच्या चेह-या ओरबडल्याने ती रक्तबंबाळ झाली होती. या घटनेनंतर लगेचच चिमुकलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती ठिक असल्याचे आहे, असे त्याने सांगितले. (monkey tries kidnapping little girl)

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे…

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक 3 वर्षाची निष्पाप मुलगी तिच्या घराबाहेरील रस्त्यावर आपल्या खेळण्यातील स्कूटरसोबत खेळत होती. पण अचानक तेथे माकड आले आणि त्याने मुलीवर हल्ला केला. हे माकड मुलीला मुलीला ओढत नेत असल्याचे दिसते. यानंतर काही वेळाले एक माणूस घटनास्थळी धाव घेतो आणि मुलीला वाचवतो. (monkey tries kidnapping little girl)

माकडाचा शोध सुरू…

एका इंग्रजी दैनिकाच्या रिपोर्टनुसार, हल्लेखोर माकड जवळच्या डोंगरावरून 40-50 फूट खाली आल्याचे समजते. पोलीस, वनविभाग, गावातील स्थानिक समिती या वन्य माकडाचा शोध घेत आहेत. बीजिंग यूथ डेलीशी बोलताना चेंगकू काउंटीच्या प्रशासनाने सांगितले की, ‘आम्हाला असे दिसते की जवळच्या डोंगरावर माकडांचा कळप आहे, परंतु त्यांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. वन्य माकडांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जेणेकरून ते स्थानिकांचे नुकसान करणार नाहीत. तसेच आजूबाजूच्या परिसरात गस्त वाढवण्यावर भर देणार आहोत, असेही त्यांनी म्हटले. (monkey tries kidnapping little girl)

Back to top button