धुळे : पाचमौली ग्रामपंचायतीची विभागणी झाल्यामुळे तुफान हाणामारी ; १६ जणांवर दंगलीचा गुन्हा

crime
crime

पिंपळनेर: (ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील बुरूडखे व पाचमौली ग्रामपंचायतींची विभागणी झाल्याने बुरूडखे ग्रामपंचायत येथील सामान पाचमौली येथे घेवून जाण्याच्या कारणावरून १६ जणांच्या जमावाने महिलेसह सात जणांना बेदम मारहाण केल्याची घटना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

मीराबाई सुरेश साबळे रा.बुरूडखे, ता.साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुरूडखे व पाचमौली ग्राम पंचायतींची विभागणी झाल्यामुळे सुरेश साबळे, कैलास जगताप, कमलबाई दिलीप जगताप, निर्मला अनिल जगताप, शकुंतला संजय जगताप, कनुबाई साहेबराव जगताप सर्व रा.बुरूडखे यांच्या सह गेले असता विनीत रामचंद्र साबळे यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्याने सुरेश साबळे यांच्या डोक्यावर लाकडी खुर्ची मारली. तसेच भावराव आसाराम गायकवाड, दादाजी दगा गावीत, विनोद शिवलाल जगताप रा.पिंजारझाडी, कांतीलाल सिताराम मालचे, सुक्राम सोनु साळी, भरत रामसिंग मालचे, सुक्राम सोनु साळी रा. साबरसोंडा, उमेश आपु जगताप, मकन मोहल्या साळी, मिराबाई सुरेश साबळे, विनीत रामचंद्र साबळे, महारू नान-या साळी, सुरेश सुक्राम जगताप, रामसिंग वन्या साळी, आपु सुकु जगताप, मगल फुलसिंग जगताप, सुनिल शांताराम जगताप सर्व रा.पाचमौली या जमावाने देखील मारहाण केली.

या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात वरील १६ संशयितांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास असई.ए.एन.पाटील करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news