मालेगाव : एमआयएम आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

मालेगाव : एमआयएम आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
Published on
Updated on

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : हिजाब समर्थनार्थ झालेल्या मुस्लिम महिलांच्या मेळाव्याप्रसंगी एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी सितेचा वनवास आणि परदा संस्कृतीबाबत केलेल्या वक्तव्याला हरकत घेण्यात आलेली आहे. पुराणात असा कोणताही दाखला नसताना मुस्लिम धर्मगुरुने केलेल्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी अ‍ॅड. मंजुषा कजवाडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अपर पोलिस अधीक्षकांना निवेदनही सादर केले आहे.

कर्नाटक राज्यात शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालून येण्यास मज्जाव करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, मालेगाव शहरात जमियत उलेमा या संघटनेच्या आवाहनावरुन दि.11 फेब्रुवारीला हिजाबच्या समर्थनार्थ हिजाब दिवसदेखील पाळण्यात आला.

तत्पूर्वी, एक दिवस आधी अजीज कल्लू मैदानावर महिलांचा मेळावा घेण्यात आला होता. त्यानंतर एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी माध्यमांशी बोलतांना हिंदू धर्मातही परदा पद्धत असल्याचे सांगताना सिता आणि लक्ष्मणाचे उदाहरण दिले होते. सिताचे रावणाने हरण केले त्यानंतरही सितेने स्वत:चे रक्षण केले. शिवाय, जेव्हा लक्ष्मणाला महिलांबरोबर उभ्या असलेल्या सितेला ओळखण्यासाठी सांगण्यात आले, तेव्हा त्यांनी चेहरा पाहून नव्हे तर फक्त पाय पाहून ओळखले होते. त्याचे कारण सांगताना, लक्ष्मणाने 'माता सितेचा मी आजपर्यंत चेहरा कधीच पाहिला नाही. मी फक्त पाय पाहूनच माता सितेला ओळखू शकतो' असे सांगितल्याचा दाखला मौलाना मुफ्तींनी दिला, त्यास अ‍ॅड. कजवाडकर यांनी आक्षेप घेतला आहे.

अशी कोणतीही घटना पुराणात नोंदवलेली नसून, आमदार मौलाना यांनी हिजाब प्रकरणाशी विनाकारण हिंदूंना गोवण्यासाठी हे खोटे विधान केल्याचा आरोप अ‍ॅड. कजवाडकर यांनी केला आहे. यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याने आमदार मौलाना यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी अ‍ॅड. कजवाडकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news