त्यातच खास महिलांसाठी कमी वजनाचे व सणाच्या पार्श्वभूमीवर गिफ्ट-ऑफरमुळे आकर्षक दागिने उपलब्ध झाल्याने गृहीणी आपल्या बजेटमध्ये सोने खरेदीसाठी महिला वर्गाची संख्या अधिक दिसून येत आहे. यामध्ये दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सराफ बाजार, कपडेलत्ते यांसह घराच्या सजावटीसाठीच्या साहित्याने शहरातील दुकाने फुलून गेली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत कोरोनाचे लागलेले ग्रहणही दूर झाल्याने, प्रथमच दिवाळी सणाचा उत्सव बाजारपेठांमधील खरेदीच्या लगबगीतून दिसून येत आहे. वसुबारसने दिवाळी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिवाळी सणानिमित्त बनविण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थांसाठी आवश्यक बाजार खरेदीसाठी सुपर मार्केट, किराणा दुकानामध्ये गर्दी दिसून येत आहे. सणानिमित्त घरामध्ये नवनवीन इलेक्ट्रानिक वस्तू, सोने, कपडे आदी प्रमुख खरेदीसाठी शहरातील छोट्या- मोठ्या बाजारपेठांत ग्राहक गर्दी करताना दिसत आहे.