पुण्यात एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत सहा वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू | पुढारी

पुण्यात एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत सहा वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली. या आगीत एका सहा वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाची 3 वाहने दाखल झाली आहेत. घटनास्थळावरून अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 सिलेंडर बाहेर काढले आहेत.

त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टाळला आहे. या आगीत अडकलेल्या ६ वर्ष वयाच्या जखमी अवस्थेतील मुलीला जवानांनी बाहेर काढले. तिला अग्निशमन दलाच्या वाहनातून रुग्णालयात रवाना केले परंतु दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. इकरा नईम खान असं मृत पावलेल्या मुलीचं नाव आहे

Back to top button