दामिनी पथक : कॅफेचालकांना दणका; प्रेमीयुगुलांवर कारवाई

दामिनी पथक : कॅफेचालकांना दणका; प्रेमीयुगुलांवर कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन तरुण – तरुणी प्रेमात पडून घरातून पळून जाण्याच्या घटना सातत्याने वाढत चालल्याने देवळा पोलिसांचे दामिनी पथक सक्रिय झाले आहे. शहरातील शिवस्मारक परिसरातील उद्यान, बसस्थानक परिसरात दोन कॅफे हाऊसवर शनिवारी (दि. 8) कारवाई करण्यात आली.तालुक्यातील पालकांच्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.

महाविद्यालय सुटल्यानंतर शिवस्मारक उद्यान तसेच बसस्थानकात रेंगाळणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थिनींची चौकशी करून दामिनी पथकाने त्यांना सक्त ताकीद दिली. त्यानंतर पथकाने बसस्थानक परिसरातील दोन कॅफे हाउसवर कारवाई केली. कॅफे हाउसमध्ये विशिष्ट हेतूने तयार करण्यात आलेला आडोसा काढण्याचे व भविष्यात अशा प्रकारे पडदे लावू नये असे स्पष्ट निर्देश कॅफेचालकांना देण्यात आले. नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला गेला. देवळा पोलिसांनी प्रेमीयुगुलांवर कारवाई केल्याने सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणार्‍यांना चाप लागला असून, ही कारवाई यापुढेही अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलिसनाईक ज्योती गोसावी, ऋतिका कुमावत, माधुरी पवार, हवालदार चंद्रकांत निकम आदींच्या पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news