जिल्हाधिकारी जलज शर्मा : नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी!

जलज शर्मा www.pudhari.news
जलज शर्मा www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2023 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवडणूक सुरळीतपणे पार पडण्यासाठी विभागानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपणावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सातपुडा सभागृहात आज नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, महेश जमदाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार (महसुल) प्रथमेश घोलप, लेखाधिकारी आर. एन. मावळे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अजिम शाह, नायब तहसीलदार प्रवीण बागूल, पंकज पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, या निवडणूकीच्या कामकाजासाठी आवश्यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण करण्यात यावे, मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे, निवडणूकीसाठी लागणारी साधनसामुग्रीची मागणी नोंदविणे, मतपत्रिका, मतपेट्यासह साहित्य वाटप करणे, निवडणूक निरिक्षकांच्या संपर्कात राहणे, आचारसंहिता भंगाबाबत अथवा पेडन्युजबाबत वृत्त प्रसिध्द झाल्यास त्यावर आवश्यक ती कार्यवाही करणे, मतपेट्यांची तांत्रिक तपासणी करणे आदि कामे सर्व संबधित नोडल अधिकारी यांनी चोखपणे पार पाडावी. त्याचबरोबर मतदान केंद्रात सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी आचार संहिता कक्षाने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सुचना त्यांनी बैठकीत केल्या. तसेच अपर जिल्हाधिकारी केकाण यांनी आचारसंहिता कक्षाची माहिती दिली. तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंतुर्लीकर यांनी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक शाखेमार्फत सुरु असलेल्या तयारीची माहिती दिली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news