दरम्यान, सातपूर पोलीस ठाण्यापासून संचलनास प्रारंभ झाला. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. स्वारबाबा नगर, राजवाडा, शिवाजी चौक, शनिमंदिर, श्री छत्रपती शिवाजी मार्केट आदी परिसरातून संचलन करण्यात आले. या संचलनात पोलीस अधिकारी शीघ्र कृती दलाचे जवान, सीआरपीएफ पथक, सातपूर पोलीस ठाणे गृह रक्षक दलाचे जवान आदीसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.