Nagar Voter Awareness Contest: मतदान जागरूकतेसाठी "तू खींच मेरी फोटो" स्पर्धा सुरू

मतदारांना प्रेरणा देण्यासाठी कुटुंब व गट फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करावे; मतदानानंतर शाई लावलेले बोट दाखवून सेल्फी पाठवण्याचे आवाहन
Selfie
SelfiePudhari
Published on
Updated on

नगर: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मनपा स्वीप समितीच्या वतीने तू खींच मेरी फोटो या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिवार, संस्था, संघटना, विविध ग्रुप आणि बचत गट यांना मतदान कार्डासह सेल्फी काढून पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, मनपा आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांनी केलेे.

Selfie
Nevasa Shop Theft: पाच दुकानांत रविवारी पहाटे चोऱ्या; सीसीटीव्ही संचासह रोख रक्कम पळवली

15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने मतदारांनी आपल्या घरातील सर्व सदस्यांचे राष्ट्रीय मतदार ओळखपत्र (Vote Card/Epic) आजच शोधून सज्ज ठेवावे. हे ओळखपत्र हातात धरून कुटुंबातील सदस्यांचा ग्रुप फोटो किंवा वैयक्तिक फोटो काढायचा आहे. मतदानासाठी इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा फोटो स्वतः च्या सोशल मीडियावर शेअर करायचा आहे.

Selfie
Sangamner Agriculture Expo: संगमनेर कृषी व डेअरी प्रदर्शनाला तीन दिवसांत ३,०९,४७२ नागरिकांचा प्रतिसाद

तसेच, मतदानानंतर शाई लावलेले बोट दाखवत सेल्फी काढून तो देशातील पहिल्या ‌’अहिल्यानगर मनपा स्वीप केअर‌’च्या 8055809394 या व्हॉट्सप क्रमांकावर 16 जानेवारी 2026 पर्यंत स्वतःच्या संपूर्ण नावासह पाठवायचा आहे. सहभागी सर्व मतदार आणि ग्रुप सहभागाचे प्रमाणपत्र व विशेष पारितोषिके देऊन गौरविणार आहे.

Selfie
Shrirampur Nagar Parishad: श्रीरामपूर नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक

जगातील सर्वात सक्षम लोकशाही असलेल्या भारताच्या मनपा निवडणूक उत्सवात शहराच्या सशक्त उभारणीसाठी प्रत्येकाने हिरीरीने सहभागी व्हावे. स्वतःला व समाजाला अभिमान वाटेल असे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

Selfie
Ahilyanagar Rural Theatre: ग्रामीण नाट्यसंघांनी संघटितपणे काम करण्याची गरज: डॉ. सोमनाथ मुटकुळे

जास्तीत जास्त मतदारांनी तू खींच मेरी फोटो या उपक्रमात सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा व मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे, प्रशासनाधिकारी जुबेर पठाण आणि मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news