

श्रीरामपूरः बेलापूर येथील घरासमोर लावलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाची काच फोडल्याची तक्रार देण्यासाठी बेलापूर पोलिस चौकीमध्ये गेलेल्या इसमास, ‘गाडीची काच कोणी फोडली,’ असे विचारल्याचा राग आल्याने त्याला कोयत्यासह लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. यावेळी कुटुंबातील सदस्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद गुन्हा दाखल झाला आहे.
बेलापूर येथील शोएब ईस्माईल शेख यांनी घरासमोर लावलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाची काच फोडल्याची तक्रार देण्यासाठी ते बेलापूर चौकीमध्ये गेले. (Latest Ahilyanagar News)
तक्रार देऊन ते परतत असताना परिसरातील गल्लीमध्ये रफिक शेख, तोफिक शेख, सुभान शेख, वसीम अत्तार व तौफिक पठाण दिसले. ‘माझ्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीची काच कोणी फोडली?’ असे त्यांना विचारले असता, सर्वांनी शोएब शेख यांना कोयत्यासह लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.
दरम्यान, रफिक शेख, तोफिक शेख, सुभान शेख, वसीम अत्तार व तौफिक पठाण यांच्या घरातील महिलांनी शेख यांचा भाऊ व आईला मारहाण केली. या घटनेची तक्रारदार देण्यासाठी ते बेलापूर चौकी येथे आले असता, त्यांच्या क्रेटा कारची काच फोडण्यात आली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शोएब इस्माईल शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसानी रफिक शेख, तोफिक शेख, सुभान शेख, वसीम अत्तार, तौफिक पठाण यांच्यासह अशा एकूण 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.