Bhandardara Dam: जून महिन्यातच भंडारदरा धरण अर्धे भरले

निळवंडे धरणाचा साठाही 3588 दशलक्ष घनफुटांवर (43 टक्के) पोहचल्याने तेही लवकरत अर्धे भरणार आहे.
Bhandardara Dam
जून महिन्यातच भंडारदरा धरण अर्धे भरलेPudhari
Published on
Updated on

अकोले: मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन-तीन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 5 हजार 542 दशलक्ष घनफुटांवर पोहचला आहे. म्हणजेच सुमारे 11 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भंडारदरा धरण निम्मे (50 टक्के) भरले आहे. सुमारे साड़ेआठ टीएमसी क्षमतेच्या निळवंडे धरणाचा साठाही 3588 दशलक्ष घनफुटांवर (43 टक्के) पोहचल्याने तेही लवकरत अर्धे भरणार आहे.

अकोले तालुक्यातील पावसाचे आगर समजल्या जाणार्‍या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात अधूनमधून पाऊस आहे. त्यात भंडारदरा धरण पाणलोटात संततधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सतत वाढत आहे. (Latest Ahilyanagar News)

Bhandardara Dam
ST buses for Wari: एसटीची 2 जुलैपासून पंढरपूर वारी; भाविकांसाठी जिल्ह्यातून धावणार 250 जादा बस

परिसरातील निसर्गाने हिरवळीची शाल पांघरली आहे. डोगरमाथ्यावर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. भंडारदरा धरणात 12 तासांत 121 दशलक्ष घनफूट नवीन पाणी आल्याने गुरुवारी सायंकाळी 5542 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्याने भंडारदरा धरण 50 टक्के भरले. मुळा पाणलोट क्षेत्रातील पिंपळगाव खांड, अंबित धरणांबरोबरच देवहंडी लघुपाटबंधारे प्रकल्पही भरल्याने शेतकर्‍यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

Bhandardara Dam
Rahuri Politics: राहुरीतही तनपुरे काका-पुतणे वेगवेगळ्या पक्षात असल्याने समर्थकांमध्ये संभ्रम

भंडारदरा परिसरात 24 तासांतील पाऊस (गुरुवारी सायंकाळपर्यंत कंसात एकूण पाऊस)

भंडारदरा : 75 (659) मिलिमीटरमध्ये

घाटघर : 89 (1048) मिलिमीटरमध्ये

रतनवाडी : 101 (1070) मिलिमीटरमध्ये

पांजरे : 78 (676) मिलिमीटरमध्ये

वाकी : 49 (443) मिलिमीटरमध्ये

निळंवडे : 3 (319) मिलिमीटरमध्ये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news