

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे, अशा तीन घटना वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी भरदिवसा घडल्या आहेत. तालुक्यातील काटेवाडी येथील काकासाहेब शंकर ढाकणे यांच्या घरी भरदिवसा चोरट्यांनी चोरी केली. तर मोहज देवढे गावात दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला.
त्यामुळे तालुक्यात चोर्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू लागले आहे. काकासाहेब ढाकणे यांच्या राहात्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेरगावी, तर त्यांच्या कुटुंबीयातील व्यक्ती 29 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता शेतात कापूस वेचण्यासाठी गेले. ढाकणे बाहेरगावावरून पुन्हा दुपारी सव्वा दोन वाजता घरी आलो.
त्यावेळी घराच्या दरवाजाची कडी, कोयंडा व कुलूप तुटलेले दिसले. घराचा दरवाजा उघडा होता. ढाकणे यांना घरात सामानाची उचकापाचक करून दिवाणाच्या गादीखाली ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले. या चोरीच्या घटनेत रोख चाळीस हजार रुपये व पावणे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले.
दरम्यान, संपतराव धर्माजी गर्जे हे 29 ऑक्टोबरला शेतामध्ये सकाळी साडेदहा वाजता कापूस वेतन्यासाठी गेले. परत दुपारी अडीच वाजता शेतातून घराकडे आले. त्यावेळी गर्जे यांना घरासमोरील पडवीचे दरवाजे, तसेच संरक्षक भिंतीच्याा दरवाजाचे कुलूप तुटले होते. घरात आत जाऊन पाहणी केली असता, घराच्या तीनही दरवाजाचे कुलपे तोडण्याचा प्रयत्न केला गेला.
संपतराव गर्जे यांच्या घराच्या पाठीमागेचे त्यांचे भाऊ विनायक धर्माजी गर्जे यांच्याही घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचका पाचल केली. या तिन्ही घटनेत चोरट्याविरुद्ध चोरी व चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर पाथर्डी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.