

ठाणे : मी कमावलेली निशाणी आहे, ढापलेली नाही, असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाशी सलगी साधल्याचे संकेत दिले आहेत. माहीम विधानसभा मतदार संघात मुलगा अमित ठाकरे यांना भाजपने पाठिंबा दिल्याने ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. भाजप-मनसे यांच्यातील वाढत्या शाब्दिक संबंधाचा परिणाम ठाणे, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या काही विधानसभेच्या जागांवर परिणाम घडवू शकतो.