Teacher Online Attendance: १५ ऑक्टोबरपासून शिक्षकांची ऑनलाइन हजेरी अनिवार्य; जबाबदारी मुख्याध्यापकांवर

‘स्विफ्ट चॅट’ ॲपमधील ‘स्मार्ट अटेंडन्स’ बॉटद्वारे उपस्थिती नोंदविणार; शाळांच्या वेळेनुसार हजेरीसाठी स्वतंत्र वेळापत्रक
Schools Smart Attendance
Schools Smart AttendancePudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांमधील शिक्षकांची ऑनलाइन हजेरी नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून ‘स्विफ्ट चॅट’ ॲपमधील ‘स्मार्ट अटेंडन्स’ बॉटद्वारे शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. यासंदर्भातील आवश्यक सूचना शाळांना देण्यात आल्या असून, उपस्थिती नोंदविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्तालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे जारी केलेल्या परिपत्रकातून स्पष्ट झाली आहे.

Schools Smart Attendance
Leopard Attack: बिबट्याशी दोन हात करत शेतकरी महिलेने वाचवला जीव!

समग्र शिक्षा, पीएम पोषण, स्टार्स आणि पीएम श्री यांसारख्या उपक्रमांतर्गत तसेच राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ई-अटेंडन्स प्रणालीचा यासाठी वापर केला जाणार आहे. राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राच्या ई-अटेंडन्स फ्रेमवर्कअंतर्गत विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती रिअल-टाइम पद्धतीने नोंदविण्याचे नियोजन आहे.

Schools Smart Attendance
Ahilyanagr Ration Distribution: अहिल्यानगर जिल्ह्यात २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना रेशनधान्याचा लाभ

यू डायस कोड किंवा मोबाईल वापरा!

शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती मुख्याध्यापकांनी नोंदवायची आहे. मुख्याध्यापक अनुपस्थित असल्यास प्रभारी मुख्याध्यापकांनी ही जबाबदारी पार पाडायची आहे. शाळा शालार्थ पोर्टलवर असल्यास मुख्याध्यापकांनी ‘स्विफ्ट चॅट’ ॲपमध्ये शाळेचा यू-डायस कोड वापरून उपस्थिती नोंदवावी.

Schools Smart Attendance
Ahilyanagr Voter Registration: अहिल्यानगर जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी ३७ हजारांवर अर्ज; दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

शाळा शालार्थ पोर्टलवर नसल्यास यू-डायस प्लस पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा वापर करावा. राष्ट्रीय शिक्षक कोड (एनटीसी) उपलब्ध असलेल्या शिक्षकांची उपस्थितीही संबंधित प्रणालीद्वारे नोंदविण्यात येणार आहे. दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांमध्ये सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत, तर अन्य शाळांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थिती नोंदविण्याच्या सूचना आहेत.

Schools Smart Attendance
Rahuri Bhagar Food Poisoning: राहुरीत भगर खाल्ल्याने १५ जणांना त्रास; तिघांना अहिल्यानगरला हलविले

रात्री ८ वाजेपर्यंत उपस्थिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असेल. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी डिजिटल स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी केले आहे. जिल्हा व विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news